भारत फोर्ज कंपनीच्या कामगारांची कार्यालयासमोर घोषणाबाजी
पुणे, दि. 14, ऑक्टोबर - पिंपरी-चिंचवड येथील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (फॅक्टरी इन्स्पेक्टर) यांच्या कार्यालयासमोर मुंढवा येथील भारत फोर्ज कर्मचारी संघटनेच्या वतीने कंपनी मधील हेल्थ, सेफ्टी आणि कारखाना अधिनियम 1948 च्या तरतुदीचे पालन करणे बाबतची तक्रार दिली. यावेळी संघटनेचे जवळपास 450 सभासद उपस्थित होते. यावेळी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली.श्रमिक एकता महासंघातील सलागार मारूती जगदाळे, दिलीप पवार. उपाध्यक्षाटील तसेच संतोष रांजणे, अजित, रोहित पवार यांनी फॅक्टरी इन्स्पेक्टर सुहास रणदिवे (ऋरलीेीूं खपीशिलीेीं) यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा केली. तसेच याबाबतचे निवेदन दिले. लवकरच कंपनीत जाऊन तपासणी करून सर्वांना त्यांचे हक्क मिळवून देऊ असे आश्वासन रणदिवे यांनी दिले.