Breaking News

जिल्हा बँक फसवणूक : आ. अमरसिंह पंडित व शिवाजीराव पंडित यांच्यावर गुन्हा दाखल

बीड, दि. 31, ऑक्टोबर - राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार अमरसिंह पंडित व त्यांचे वडील माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्यासह 28 जणांवर जिल्हा बँकेची  फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ गेवराईत सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. गढी येथील जयभवानी सहकारी साखर क ारखान्याने 2005 मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. त्यासाठी जमीन तारण ठेवली होती. पुढे हे कर्ज थकले. त्यामुळे बँकेने करखान्याला नोटीस धाडली.  नंतर हे प्रकरण कोर्टात गेले. दरम्यान, बँकेकडे तारण ठेवलेल्या जमिनीपैकी काही जमिनीचा व्यवहार झाला. जिल्हा बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या बेकायदेशीर कर्जवाटपाचे प्रकरण  चव्हाट्यावर आल्यावर जयभवानी कारखान्याने तारण ठेवलेली काही जमीन परस्पर विकल्याचे उघडकीस आले. त्यावरुन 12 वर्षे जुन्या प्रकरणात जिल्हा बँकेने फौजदारी क ारवाईसाठी गेवरराई ठाण्यात धाव घेतली. सोमवारी पहाटे तारण मालमत्तेपैकी काही जमीन परस्पर विक्री करुन बॅँकेची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीराव पंडित, अमरसिंह पंडित,  जयसिंह पंडित व कारखान्याचे तत्कालीन संचालकमंडळ अशा एकूण 28 जणांवर गुन्हा नोंद झाली आहे तर या कारवाईच्या निषेधार्थ गावकर्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांचा पुतळा  जाळला आणि निषेधाच्या घोषणा दिल्या गेवराई तालुक्याती अनेक गावांनी बंद पाळला.