Breaking News

मोटारसायकलवर भारतभ्रमण करणा-या राधिकाचे नगरमध्ये जोरदार स्वागत

अहमदनगर, दि. 14, ऑक्टोबर - चेन्नई येथील युवती राधीका राव वयाच्या 2वर्षी भारतातील संस्कृतीचे वैविधतेचे ज्ञान घेण्यासाठी एकटी सुमारे 20 हजार किलो मिटरच्या प्रवासासाठी 9 एप्रिलपासून निघाली असून,काल नगरमध्ये तिचे आगमन झाले असता.येथील होनाराडू कन्नडीगर संघाच्यावतीने स्वागत करण्यात आले.संघाचे सेक्रेटरी नित्यानंद नाईक, खजिनदार के.डी.राव,शिवकुमार राव,आर.के.राव,श्रीमती भट यांनी तिचे स्वागत केले.याप्रसंगी एल अ‍ॅण्ड टीचे अरविंद पारगांवकर व आय्यप्पा सेवा समितीचे अध्यक्ष के. क. शेट्टी यांनीही उपस्थित राहून राधिका राव हिला पुढील प्रवासास शुभेच्छा दिल्या. 
भारतातील प्रमुख शहरे,गावे,राजधानी तसेच मुंबई,दिल्ली,हैद्राबाद,श्रीनगर,जम्मू,पंजाब,चंदीगड,बिहार,पटणा,उत्तर प्रदेश,हिमाचल प्रदेश आदि ठिकाणाहून प्रवास करुन काल ती सायंकाळी नगरला आली.राधिकाशी बोलत असतांना तिने सांगितले की,मला भारतातील निसर्गरम्यता भारतातील वैविध्यता,संस्कृती,येथील राहणीमान जाणून घेण्याची पूर्वीपासून मोठी आवड होती.याचबरोबरच फोटोग्राफी या कलेची मला आवड असल्याने याचे एक डॉक्युमेंट्रेशन करावे,असे मनात असल्याने त्यास मुर्त स्वरुप आणण्याचा हा माझा प्रयत्न आहे.घरातून मी एकटी मुलगी असल्यामुळे निघण्यासाठी परवानगी घेतांना बराच त्रास झाला. तरीपण माझ्या एकदरीत धाडसीवृत्तीमुळे ही परवानगी मिळाली व मी प्रवासास निघाले रोज 300 ते 400 कि.मी.चा प्रवास मी करते.या प्रवासासाठी अ‍ॅव्हेंजर 220 सीसी ची दुचाकी बाईक वापरते.कधी-कधी ताशी 110 कि.मी.च्या वेगाचाही मला वापर करावा लागतो. वाहतुकींच्या नियमांचे पालन करणे हे सर्वांच्या जीवनाच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून आवश्यक अशी बाब आहे एकवेळेस रस्ते खराब असले तरी चालते परंतु नियम न पाळल्यास अपघाताचे प्रमाण वाढलेले दिसते.पटणा,उत्तर प्रदेश, कलकत्ता अशा अनेक शहरांमध्ये वाहतुकींचे नियम पालन केले जात नसल्यामुळे प्रवास करताना अतिशय त्रास झाल्याचे सांगितले.या प्रवासात मला विविध ठिकाणीचे,विविध प्रकारचे नागरिक भेटतात. तेथील जनतेचा संपर्कामुळे, त्यांच्याशी केलेल्या चर्चेमुळे ज्ञान मिळते,अनुभव येतात.रोज दिवसा प्रवास करुन रात्री बहुतेककरुन कौटूंबिक माहिती घेऊन एखाद्या कुटूंबामध्ये मी मुक्काम करते.प्रवासामध्ये अनेकांच्या चेहर्या वरील ताण-तणाव,स्मित हास्य, नैसर्गिक वातावरण मी कॅमेर्यामध्ये टिपते.प्रवासामध्ये भारतातील एकता,अखंडता व शांतता कशी टिकविली जाईल;यासाठी मी नागरिकांशी सुसंवाद साधते.शेतकरी,कामगार वर्ग,विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक,धाडसी खेळाडू,विविध क्षेत्रातील मान्यवर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करते.विविध प्रांतातील वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांसोबत त्यांच्या खान-पानाविषयी,राहणीमानाविषयी माहिती घेऊन त्याचे कुटूंबांतील महिलांसोबत सुरक्षिततेच्या उपाय योजनांविषयी उहापोह करुन त्याचे छायाचित्रणही करते.
दुचाकीवरचा हा प्रवास एकटीच करण्याअगोदर तीने त्या गाडीविषयी गॅरेजमध्ये जाऊन मोटारसायकल दुरुस्तीचे संपूर्ण ज्ञान अवगत करुन घेतले.प्रवासाची क्षमता वाढविण्यासाठी 44 वजनावरुन 55 किलो वजन वाढविले. तसेच स्त्री संरक्षणासाठी लागणारे बॉक्सिंग,ज्युदो चे प्रशिक्षणही तिने अवगत केले.अशी पूर्व तयारी तिने केले.नंतरच शेवटी तिच्या आई-वडिलांनी या भारत भ्रमणासाठी तिला शुभेच्छा दिल्या.जयपुर येथे आजारी पडली असता तिने तिथेच उपचार घेतले व हिंमत न हारता उन-वारा-पाऊस याची तमा न बाळगता पुढील प्रवासाची वाटचाल सुरु केली. मोबाईलच्या माध्यमातून ती सतत घरच्यांच्या,नातेवाईकांच्या व विविध गावातील पोलिस स्टेशन,रेल्वे स्टेशन येथील शासकीय अधिकार्यांशी ती संपर्कात राहते. पुढील प्रवास सुरक्षित व सुखकर होण्यासाठी याचा तिला मोठा फायदा होतो. तिचा हा प्रवास एकूण 250 दिवसांचा नियोजित असून,प्रवासामध्ये सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून सर्व अद्ययावत साहित्य तिच्या बरोबर असते.या प्रवासाचा उद्देश महिलांमधील धाडसीवृत्ती वाढीस लागावी,देशभरातील विविध ठिकाण व संस्कृतीचे दर्शन घडावे,यासाठी छायाचित्र प्रदर्शन देशभर भरविण्यात येणार असल्याचे तिने सांगितले.भारतातील अशा पद्धतीने एकटीने दुचाकीवर प्रवास करणारी ही पहिलीच महिला ठरली आहे.जिद्द,चिकाटी आणि वृत्तीच्या या युवतीचे सर्वत्र अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे.