पुणतांबा ते कानगांवः प्रश्न संपणार? की.......
कुमार कडलग/ नाशिक, दि. 31, ऑक्टोबर - कुठल्याही राज सत्तेकडून आपल्या प्रजेच्या अपेक्षांना न्याय मिळाला नाही तर त्या राजसत्तेविरूध्द रयतेत असंतोष निर्माण होऊ लागतो. हळूहळू हा असंतोष विकोपाला जाऊन क्रांतीची बीजं पेरली जातात.मनात दाबून ठेवलेला असंतोष जेंव्हा लाव्हा बनून बाहेर उसळी घेतो तेंव्हा होणारी क्रांती बलाढ्य राजशक्त ी थोपवू शकत नाही. हा इतिहास आहे.
लोकशाहीत आंदोलनं,मोर्चा, संप ही आयूध जनतेच्या मनात दाटलेला असंतोष व्यक्त करण्यासाठी वापरण्याची प्रथा आहे. संघटीत वर्ग या घटनात्मक आयूधांचा वापर करून लोक शाहीतील राजव्यवस्थेची म्हणजे शासनाची कोंडी करण्यात यशस्वी होतो. संप मोर्चा ही आयूध म्हणूनच या संघटीत वर्गाची मक्तेदारी मानली जात होती. आपले हक्क मिळवण्यात अग्रेसर असलेला संघटीत वर्ग हाच एकमेव शासनावर प्रभाव आणि दबाव ठेवणारा घटक म्हणून ओळखला जात होता.परिणामी सर्वच क्षेञात असंघटीत असलेला एक वर्ग नेहमीच तोंड दाबून बुक्यांचा मार खात जगत असल्याचे चिञ काल परवा पर्यंत होते. माञ गेल्या वर्ष दिड वर्षाच्या काळात ही परिस्थिती बदलतांना दिसते आहे. विशेषतः आजवर असंघटीतपणाचा पिढीजात शाप घेऊन जगत असलेला सकल मराठा समाज एका दुर्दैवी घटनेच्या निमित्ताने का होईना संघटीत झाला. मराठा संघटीत होण्यासाठी या दुर्दैवी घटनेची वाट पहावी लागली ही शतकांची शोकांतिका असली तरी परिणाम सकारात्मक दिसला ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणायला हवी. लाथाळी ज्यांना वरदान (खरंतर शाप) आहे असा समाज, पिढीजात भाऊबंदकी विसरून एकञ आल्याने विखूरलेला आणि राजकारणाच्या गव्हाणीत बांधून ठेवलेला कुणबी समाजही आपल्या हक्कांसाठी जागरूक होण्याची प्रक्रीया सुरू झाली. आणि आपल्या हक्कांसंदर्भात राजसत्तेला जाब विचारण्याइतपत धाडस दाखवू लागला.
अनेक पिढ्यांपासून पृथ्वीतलावर स्वाभीमानी समाज म्हणून ओळखला जाणारा हा कष्टकरी कुणबी समाज स्वातंञ्योत्तर राजकीय व्यवस्थेने हा स्वाभीमान अक्षरशः चिरडला.सत्ताधार्यांनी राबविलेल्या भांडवलशाही प्रधान धोरणांनी या समाजाला लाचार बनविले. राजकारण्यांनी या समाजाला लाचार बनविले.परिणामी पिढीजात व्यवसाय असलेली शेती धोक्यात आली.एकाबाजूला लहरी निसर्ग आणि दुसर्या बाजूला स्वदेशी राज्यकर्त्यांचे तुघलकी धोरणे या काञीत सापडलेला अन्नदाता स्वतःचे,कुटूंबाचे पोट भरण्यासही नालायक ठरला.या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याऐवजी सत्तेत असलेल्या आणि नसलेल्या राजकीय मंडळींनी या हलाखीचा राजकीय भांडवल म्हणून वापर करून घेतला.त्यात शेतकर्यांचा कैवार घेऊन भुछञांच्या वेगाने निपजलेल्या असंख्य संघटनांची भर पडली.बळीराजाच्या दुर्दैवाने या संघटनांचा चेहरा कष्टकर्याचा दिसत असला तरी शरीर आणि बुध्दी माञ राजकारण्यांची निघाली.वेगवेगळ्या झेंड्यांनी शेतकर्याला आपल्या हक्कांसाठी कधी एकञ येऊ दिले नाही.
माञ देर आए दुरूस्त आयें या उक्तीप्रमाणे बळीराजाला आपण वापरले जात असल्याची जाणीव झाली आहे त्याची तिव्रता एव्हढी आहे की हा कष्टकरी समाज राजकारण्यांच्या सावलीलाही उभा रहायला धजावत नाही. त्यातून कधी नव्हे शेतकर्याचे संघटन उभे राहीले आहे. ही माती माझी आहे.या मातीवर उभी राहीलेली प्रत्येक गोष्टीवर माझी मालकी आहे.माझ्याघरात येऊन दरोडा टाकण्याचे दिवस आता संपलेत असे तो छाती ठोकून व्यवस्थेला सांगू लागला आहे. हे वास्तव अन्नदात्याशी द्रोह करणार्या कुठल्याही शक्तीला समूळ नाश केल्याशिवाय राहणार नाही.शेतकरी स्वनेतृत्वावर आपले हक्क मिळवण्यास सक्षम झाला आहे . ही जाणीव अन्य संघटनांनाही झाल्याने वेगवेगळ्या विचारधारेची मंडळी शेतक र्यांच्या एकजूटीला अभिवादन करून शेतकरी हिताच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत.
संघटीतपणाच्या पातळीवर सारे काही सकारात्मक असले तरी या प्रवाहाला योग्य दिशा मिळाली नाही तर कुर्हाडीचा दांडा गोतास काळ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेतक र्यांच्या नृव्याने उभ्या राहीलेल्या या चळवळीत सळसळत्या रक्ताचे नवतरूण मोठ्या प्रमाणात आहेत. क्रयशक्ती ठासून भरली आहे.या नवउर्जेचा वापर योग्य पध्दतीने करून घेण्याची जबाबदारी सुकाणू समितीवर आहे तर नवउर्जेचा वापर राजकीय हेतूने केला जाणार नाही याची खबरदारी जाणत्या नवतरूणांना घ्यावी लागणार आहे.
सध्या ही चळवळ पुन्हा एकदा संपाच हत्यार उपसून सरकारला जाब विचारण्यास सज्ज झाली आहे.अगदी सुरूवातीलाच म्हटल्याप्रमाणे असंघटीत वर्गाने संघटीत होऊन संपाचं घटनात्मक आयूध व्यवस्थेविरूध्द वापरण्याचे ठरविले. तो प्रयोग जुन महीन्यातही झाला .पुणतांब्याहून पेटलेली ज्योत महाराष्ट्रात वणवा पेटविण्यास कारणीभूत ठरली.या वणव्यात क ाय कमावले काय गमावले याचा हिशेब मांडला गेला आहे.परंपरेप्रमाणे राजकीय घात झाला हेही सर्वश्रूत आहे.पुन्हा दौंड तालूक्यातील कानगावमधून ही ज्योत पेटवली जात आहे.या ज्योतीला महाराष्ट्रभर फिरवण्यासाठी वेगवेगळे हात पुढे येत आहेत.जुनमध्येही शेतीची कामे जोरात सुरू असतांना बळीराजाने संप करण्याची हिंमत दाखवली होती.दोन नोव्हेंबरला होऊ घातलेल्या सःपालाही तीच पार्श्वभूमी आहे.शेतीची कामे या काळातही प्रगतीपथावर असतात.अशा वेळी संप करतांना शेतीची कामे खोळंबणार नाहीत याचे नियोजन अत्यावश्यक आहे.सरकारला धडा शिकवत असतांना आपली शेती किंवा एक पुर्ण हंगाम उध्वस्त होणार नाही याची काळजी शेतकर्याने स्वतः घ्यायला हवी. पिकवलेला शेतीमाल बाजारात आणू नका पण नृवीन माल पिकवायचाच नाही भूमीका घेऊन सारा हंगाम वाया घालवू नका एव्हढच कळकळीचं सांगण आहे. संपातून भरघोस पदरात पाडून घेत असतांना आपल्या प्रश्नांना संपविण्यासाठी नियोजन करा. तुर्तास इतकेच.