Breaking News

राज्य चालविण्या हवेत जातीचे.................

दादा मंञ्यांच्या वक्तव्यावर बळीराजा संतप्त

मुंबई - (विशेष प्रतिनिधी), दि. 31, ऑक्टोबर - शेंदूर फासला म्हणून देवत्व प्राप्त होत नाही तद्वतच मंञीपद मिळाले म्हणजे रयतेविषयी आतून भावणारा कळवळा ओढून ताणून  आणता येत नाही, जाणते अजाणतेपणे मुळ स्वभाव ओठावरून घरंगळाणार्या शब्दातून व्यक्त होतो, असाच काहीसा प्रत्यय महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंञी चंद्रकांत दादा  पाटील यांच्या कार्य-वर्तनातून पावलो पावली जाणवतो आहे. रवीवारी मुक्ताईनगर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाप्रसंगी नामदार महोदयांनी शेतकर्यांच्या कर्जबाजारीपणावर  उधळलेली मुक्ताफळे शेतकर्यांच्या भळभळत्या जखमेवर लवंगीची पुड फेकणारे ठरले शिवाय राज्य चालविणे येर्या गबाळ्याचे काम नव्हे इथे पाहिजेत जातीचे या संत तुकोबारायांच्या  संतवचनाची प्रकर्षाने आठवण देऊन गेले.
देशात आणि राज्यात सत्तांतर होऊन कारभाराची सुञे हातात घेतलेल्या भाजपेयी मंडळींच्या जीभेचे हाड एकाकी मलूल झाल्याने ती कुठेही कशीही घसरू लागली आहे.विशेषतः  देशपातळीवर शेतकरी हलाखीच्या परिस्थितीत असतांना बळीराजाला आधार देण्याऐवजी या हलाखीच्या आपल्या औकातीनुसार भाजपची चेष्टा करू लागले आहेत. कुणी शेतकर्याला  व्यसनाधीन म्हणू लागले तर कुणी त्याला रंडीबाज संबोधू लागले. वास्तविक शेतकर्यांच्या या हलाखीला राज्यकर्त्यांचा चाःडाळपणा कारणीभूत असतांना आपल्या नाकर्तेपणाचे पाप  शेतकर्याच्या माथी मारण्याचा प्रमाद सत्ताधारी करीत आहेत.
महाराष्ट्राचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंञी चंद्रकांत दादा पाटील यांनी तर जळगावच्या भुमीत शेतकर्याच्या कर्जबाजारीपणावर मुक्ताफळे उधळून भळभळत्या जखमेवर क ोल्हापूरी लवंगी मिरचीची पुड फेकली आहे.
शेतकर्याने काढलेले कर्ज भरायला हवे, ते भरले नाही तर शेतकर्यांचे कर्ज माफ करता करता राज्यच कर्जबाजारी होईल.अशा आशयाचे वक्तव्य करून दादासाहेबांनी कर्तृत्वशुन्यतेला  लपविण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया राज्यभर उमटू लागल्या आहेत.
महसूल खात्याचा पदभार सांभाळणारा जबाबदार मंञी अशा प्रकारचे विधान करतो याचा अर्थ मंञी महोदयांना राज्याच्या अर्थव्यवस्थेचा, कार्यप्रणालीचा आणि शेतीच्या अर्थकारणाचा  अभ्यास नाही हा दुर्दैवी निष्कर्ष निघतो.
तीन वर्षापासून शेतीला उर्जीतावस्था प्राप्त करून देऊन शेतकरी स्वावलंबी होईल अशी कुठलीही योजना दादासाहेबांच्या पारदर्शक राबविली नाही.शेतकर्यांनी घाम गाळून पिकवलेल्या  मालाला उत्पादन खर्चा इतकाही भाव बाजारात मिळत नाही. गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी हमीभावासाठी झगडतो आहे. किंबहूना शेतकर्याला हमीभाव देण्याच्या भुलथापा देऊनच  हे सरकार सत्तेवर आले याचे पुर्ण ज्ञान दादासाहेबांना आहे.मग कर्ज फेडण्याचा अनाहूत सल्ला देण्याची कुठून आली? असा सवाल महाराष्ट्रातील शेतकरी करीत आहेत.
राज्य कर्जबाजारी होईल ही चिंता दादासाहेबांना भेडसावते आहे, या राज्यावर या मंडळींच्या कर्तृत्वाने चार लाख कोटीचे कर्ज आहे. प्रत्येक शेतकरी कुटूंब सदस्याच्या डोक्यावर या  सरकारने सरासरी चाळीस हजाराचे कर्ज लादले आहे.शेतकर्याला कर्जमाफी देणे म्हणजे कररूपाने जमा झालेला निधी पुन्हा वाटून देणेवा असे नौटंकी समिकरण मांडणारे  मंञी  दादासाहेब याच कराच्या आपल्या दौर्यासाठी उधळपट्टी करतात.बुलेट ट्रेन, समृध्दी महामार्ग आणि अन्य अनूउत्पादीत प्रकल्पांवर वारेमाप खर्च करतात. लोकप्रतिनिधींच्या चैनीसाठी  हाच करनिधी उधळला जातो. लोकप्रतिनिधींच्यि वेतनवाढीने शासनावर कर्ज होत नाही. अशा गांडूळ प्रवृत्तीच्या वक्तव्यखोर मंञ्यांमुळे महाराष्ट्र सरकार बदनाम होऊन जनतेचा रोष  ओढवून घेत आहे.
चंद्रकांत दादा पाटील यांच्या कडे सार्वजनिक बांधकाम खात्याचाही पदभार आहे. या खात्यात माजलेली बेदीली सर्वश्रूत आहे.जनतेनेषकररूपाने राज्याच्या तिजोरीत जमा केलेल्या  निधीचा साबांतील भ्रष्ट अभियंते राजरोस अपहार करीत आहे, तो अपहार रोखण्याऐवजी साबांमंञी भ्रष्टाचाराला पाठीशी घालतात, तेंव्हा राज्य कर्जबाजारी होईल ही भिती त्यांना  सतावत नाही.
चंद्रकांत दादा पाटील यांना मंञीपद हे कर्तृत्वाने नाही तर मेहेरबानीने मिळाले आहे.कर्तृत्व नसले तर मिळालेल्या संधीचं खोबरं होतं अशी दखलपाञ नोंद इतिहासात सापडते,महासूल  आणि साबां मंञालयात असाच खिरापतीचा कारभार सुरू असल्याने या सरकारला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल असा जाणकारांचा होरा आहे.
कर्तृत्वशून्य मंञ्यांकडून ना सरकारचे भले होणार ना जनतेचे. म्हणून शेंदूर फासलेल्या देवाची पुजा नको रे बाबा अशा प्रतिक्रिया जनमानसातून उमटू लागल्या आहेत.
उपअभियंता बागुल यांची भ्रष्टाचाराची युनीटी
सार्वजनिक बांधकाम खात्यात माजलेली बेदीली दर दिवशी वेगवेगळ्या बातमीची शाल पांघरून माध्यमांमधून डोकावत आहे.सध्या मुंबई साबां प्रादेशिक विभागातील शहर इलाखा  विभागा संशयाच्या रडारवर असून आमदार निवास, मंञालय इमारत, अन्य शासकीय कार्यालये आणि निवासस्थाने असा महत्वाचे क्षेञ असलेल्या या विभागातील भ्रष्ट अभियंते  शासकीय निधी कुरतडू लागल्याने, या सिध्द झालेल्या अपहाराकडे साबां मंञालय हेतूपुरस्सर दुर्लक्षकरू लागल्याने अवघे साबां कार्यक्षेञ संशयाच्या भोवर्यात आहे.
मंञालयासारख्या संवेदनशील आणि अतिमहत्वाच्या भागात उपअभियंता बागूल यांच्या हातसफाईचा नवा अध्याय सध्या चर्चेत आहे. 14आगस्ट 2015 ते 23 नोव्हेंबर 2015 या क ालावधीत तब्बल तेवीस लाखांचा झोल करून उपअभियंता बागूल यांनी भ्रष्टाचाराची नवी युनीटीस्थापन केली आहे. या विभागात नव्याने दाखल झालेल्य आपल्या कनिष्ठ अननूभवी   सहकारी अभियंत्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना बळी देण्याचा हा डाव साबांत सध्या चर्चेचा विषय आहे.