सरकार स्थानावर राहु केतूची वक्रदृष्टी
दि. 31, ऑक्टोबर - आगामी काही दिवसांचा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत कसोटीचा ठरणार असल्याचे संकेत मिळू लागलेत.विशेषतः राज्याच्या राजकीय कुंडलीत सरकारस्थानावर राहू केतूंची वक्रदृष्टी असल्याचा होरा राजकीय भविष्यवेत्त्यांनी व्यक्त केल्याने येत्या काही दिवसात खळबळ उडविणारी राजकीय उलथापालथ अपेक्षित आहे.
संसाराची दोन्ही जागे विसंगत प्रवृत्ती आणि प्रकृतीची असतील तो संसार शेवटपर्यंत तडीस जात नाही.जोडीदाराच्या गुणदोषांचा संसारावर अनूकुल प्रतिकुल परिणाम होत असतो. विशेषतः प्रतिकुल परिणाम टाळण्यासाठी लग्न कुंडली पाहून उभयतांचे गुण जुळवण्याची प्रथा समाजात रूढ आहे. या प्रथेवर नितांत श्रध्दा असलेली मंडळी राज्याचा कारभार हाकीत आहे. राज्यात भाजपा शिवसेना या दोन प्रमुख पक्षांची सत्ता आहे. या दोन्ही पक्षांनी सत्तेचा संसार करतांना त्यांच्या राजकीय गुणदोषांकडे दुर्लक्ष करून सरकारचे गाडे दटावण्याचा प्रयत्न तीन वर्ष केला पण उभयतांना आता हा संसार पुढे रेटणे दोघांच्याही दृष्टीने तारेवरची कसरत ठरली आहे.दोघांमध्येही असलेली फाजील महत्वाकांक्षा सरकारस्थानावर राजकीय राहु केतुंची वक्रदृष्टी पडल्याने सत्तेच्या संसारात वितूष्ट आले आहे.
या संसारात मधुचंद्राची गोडी संपण्याआधीच सुरू झालेली कुरबूर आज विकोपाला गेली आहे.कुठल्याही क्षणी घटस्फोट होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच नारायणरावांची महत्वाकांक्षा उफाळून आल्याने हा संसार आणखी धोक्यात आला आहे.नारायणराव आणि मातोश्री यांच्यात असलेले सख्य सर्वश्रूत आहे.त्यातच फडणवीस नव्याने क रू पहात असलेला घरोबा मातोश्रीच्या जिव्हारी लागून घटस्फोटाची प्रक्रिया वेग घेण्याची शक्यता आहे.
मातोश्रीवरून घटस्फोटाचा फतवा निघाला तर आजच्या घडीला ती सर्वात मोठी बातमी ठरेल. आणि नव्या राजकीय संसाराची बीजे पेरली जातील अशीही शक्यता उठणार्या वावड्यांचा आधार घेऊन व्यक्त केली जात आहे.
मातोश्रीने घटस्फोटाचा फतवा काढलाच तर भाजपाचे कसलेले राजकीय पहिलवान या फतव्याचा तेल लावून मुकाबला करण्यास तयार असल्याचे सांगितले जात आहे.फतवा झुकारू न काही सैनिक बंड करतील का याचा अंदाज भाजपाचे थिंक टँक घेत असतानाच इकडे फडाणवीस थोरल्या साहेबांचा आशीर्वाद मिळावा म्हणून सातत्याने बारामतीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
नमूद क्रमाप्रमाणे या सार्या घडामोडी घडल्या तर आगामी काळात सरकार स्थानावर वक्र नजर ठेवून आसलेले राहु केतू मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणण्यात यशस्वी होतील हे माञ नक्की.