Breaking News

अशोक लेलँडतर्फे नवी मुंबई बाजारासाठी आयसीव्ही एक्स्पोचे आयोजन

नवी मुंबई, दि. 14, ऑक्टोबर - अशोक लेलँड या हिंदुजा समूहाच्या प्रमुख कंपनीने व भारतातील व्यावसायिक वाहनांच्या सर्वात मोठ्या उत्पादकांतील एक असलेल्या कंपनीने आज नवी मुंबई येथील आयसीव्ही एक्स्पोमध्ये भविष्याच्या दृष्टीने सज्जअसलेली उत्पादने प्रदर्शित केली. आयईजीआर तंत्रज्ञानासह आयसीव्ही उत्पादने आणि अशोक लेलँडची डिजिटल सोल्यूशन्स हे या एक्स्पोचे मुख्य आकर्षण होते.
आयसीव्ही एक्स्पोचे उद्घाटन करताना, अशोक लेलँडचे ग्लोबल ट्रक्सचे अध्यक्ष अनुज कठुरिया यांनी सांगितले, अशोक लेलँडने मोठी वाटचाल केली आहे आणि आज ही केवळ वाहनांची उत्पादक कंपनी नसून, सर्व प्रकारची सोल्यूशन्स देणारी कंपनीम्हणून नावारूपास आली आहे. आमचे ग्राहक केवळ ट्रक खरेदी करण्यासाठी आमच्याकडे येत नसून, ते त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने जास्तीत जास्त सेवा मिळवण्यासाठी आमच्या ब्रँडकडे येतात. आम्ही ग्राहकांना त्यांच्या गरजा विचारून घेतो वत्यानुसार सेवा देतो. यामुळे, तसेच आम्ही अलीकडेच दाखल केलेल्या डिजिटल मार्केट सोल्यूशन्समुळे आम्हाला उत्पादनाच्या संपूर्ण जीवनचक्रादरम्यान ग्राहकांना सेवा देणे व पाठबळ देणे शक्य होते. आप की जीत, हमारी जीत या आमच्या ब्रँडच्या विचारसरणीच्या सक्षम पायामुळे, ग्राहकांचे जीवन सुकर करण्याचा आणि त्यांचा व्यवसाय अधिक नफात्मक करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. या एक्स्पोच्या माध्यमातून आमचा हा प्रयत्न ग्राहकांना दर्शवला जाईल व आम्ही त्यांच्याव्यवसायासाठी देत असलेले मूल्यही त्यांना सांगितले जाईल.
गेल्या 5 वर्षांमध्ये, अशोक लेलँडने आयसीव्ही श्रेणीतील आपला बाजारहिस्सा वाढवण्यासाठी लक्षणीय प्रयत्न केले आहेत व त्यांचे चांगले फळही मिळाले आहे. आम्ही आमचा बाजारहिस्सा पाच वर्षांपूर्वीच्या 6% वरून आता 22% पर्यंत वाढवला आहे.इकोमेट, बॉस व आम्ही नव्याने समाविष्ट केलेल्या गुरू या ग्राहकांना मोठे मूल्य देणार्‍या उत्पादनांमुळे ही प्रगती शक्य झाली. या वर्षी आम्ही फुल्ली-बिल्ट उत्पादनांच्या माध्यमातून ग्राहकांना कस्टमाइज्ड सोल्यूशन्स दिली आहेत.