Breaking News

मुंबई-नागपूर 4 विशेष गाड्या; दिवाळीसाठी रेल्वेकडून प्रवाशांना भेट

नागपूर, दि. 14, ऑक्टोबर - दिवाळीनिमित्त रेल्वेत होणारी प्रवाशांची गर्दी आणि प्रतीक्षा यादी वाढत चालली आहे. प्रवाशांची ही अडचण लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूरदरम्यान 15 व 22 ऑक्टोबर रोजी 4 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विशेष शुल्क आकारले जाईल. या गाड्यांचे आरक्षण संगणकीकृत आरक्षण केंद्रावर 13 ऑक्टोबरपासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या गाड्यांचा तपशील असा- नागपूर- मुंबई विशेष ही गाडी 15 व 22 ऑक्टोबर रोजी नागपूरवरून 16.15 वाजता सुटेल व दुसर्या दिवशी 8.15 वाजता सीएसटी मुंबई येथे पोहोचेल. मार्गातील स्थानकांवर या गाडीच्या आगमन- प्रस्थान वेळा अशा राहतील- (वर्धा 17.20, 17.22), पुलगाव (17.46, 17.47), धामणगाव (18.06, 18.08), बडनेरा (19.30, 19.35), अकोला (20.45, 20.38), शेगाव (21.05, 21.08), मलकापूर (21.50, 21.52), भुसावळ (23.20, 23.30), नाशिक. दुसर्या दिवशी (3.40, 3.43), इगतपुरी (4.50, 4.55), कल्याण (7.00, 7.02), दादर (8.47, 7.50).मुंबई- नागपूर विशेष- ही गाडी रविवारी 15 व 22 ऑक्टोबर रोजी मुंबईवरून 00.20 वाजता सुटेल व 14.20 वाजता नागपूरला पोहचेल. मागार्तील स्थानकांवर या गाडीच्या आगमन- प्रस्थान वेळा अशा राहतील- दादर (00.33, 00.35), कल्याण (1.35, 1.37), इगतपुरी (3.30, 3.35), नाशिक (4.27, 4.30), भुसावळ (7.35, 7.45), मलकापूर (8.18, 8.20), शेगाव (8.58, 9.00), अकोला (9.25, 9 .28), बडनेरा (11.00, 11.05), धामणगाव (11.41, 11.42), पुलगाव (11.58, 11.59), वर्धा (12.32, 12.35). या गाडीला 16 कोच राहतील. यात 14 द्वितीय श्रेणी सीटिंग कोच व 2 एसएलआर कोच राहतील. प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने केले आहे.