फोडाफोडी नाही तर शिवसेनेचे मजबुतीकरण केल्याचा उद्धव ठाकरेंचा दावा
मुंबई, दि. 14, ऑक्टोबर - अन्य पक्षातील नगरसेवकांना पक्षात आणून कुणाला कमजोर करण्याचा नाही, तर शिवसेनेला मजबूत करत आहे, असा दावा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिलीप लांडे, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, हर्षल मोरे व अश्विनी मतेकर या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्याचे श्री. ठाकरे यांनी जाहीर केले. या प्रवेशानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांचे संख्याबळ 91 वर पोचले आहे.
हे फोडाफोडीचे राजकारण नाही, तर पूर्वाश्रमीच्या शिवसैनिकांची घरवापसी झाली आहे. शिवसेनेने घोडेबाजार केल्याचा आरोप गाढवांनी करू नये, असा टोलाही श्री. ठाकरे यांनी लगावला. अन्य कोणा पक्षांनी फोडाफोडी केली तर ती खुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी म्हटली जाते. असे असेल तर एका दिवसात एवढी जमवाजमव करू शकत असेल तर शिवसेनेच्या ताकदीचा विचार करावा. या माध्यमातून शिवसेना आपली ताकद वाढवत आहे. जुने व काही नवीन सहकारी पक्षात येत आहेत त्यांचे स्वागत आहे. यातून मुंबईकरांची सेवा अधिक प्रभावीपणे करू, असेही श्री. ठाकरे म्हणाले.
भाजप स्वत:ला मित्रपक्ष म्हणत असेल तर त्यांनी शिवसेनेच्या आनंदात सहभागी व्हावे. जर आमच्या आनंदाने त्यांच्या पोटात दुखत असेल तर कोण खरे कोण खोटे जनतेने ओळखावे. मनसेचे अध्यक्ष व भाऊ राज ठाकरे यांना सांगून केले नाही, यावर जेव्हा शिवसैनिक मनसेत गेले तेव्हा ॠमातोश्री’वर आपलाही एक भाऊ रहातो याचा राज ठाकरे यांनी विचार केला होता का, असा प्रश्नही श्री. ठाकरे यांनी विचारला.
भांडुप येथे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाला. त्यानंतर भाजपच्या काही नेत्यांना आपलाच महापौर बनण्याचे स्वप्न पडू लागले. शिवसेनेने मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या हितासाठी काम केले. मात्र मराठी माणसाला संपवण्याची भाषा काल काही नेत्यांनी केली. पण मराठी माणसाच्या वाटेला कोणी जाऊ नये. मराठी माणसाला संपवण्याची भाषा कोणी करू नये. मराठी माणसाला आव्हान दिल्याची चीड आल्याने व शिवसेनेला ताकद देण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे, अशी प्रतिक्रिया मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी व्यक्त केली.