धुळ्यात खोदकाम करताना सापडली 500 चांदीची नाणी
धुळे, दि. 31, ऑक्टोबर - धुळे शहरातील गल्ली नंबर दोनमध्ये घराचे खोदकाम करताना चांदी मिश्रण असलेले 500 नाणी सापडली आहेत. या ठिकाणी मनोज हेडा यांच्या घराचे काम सुरू आहे. यावेळी खोदकाम करताना पत्र्याचा डबा आढळला. ही माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुडें यांना देण्यात आली. त्यानंतर हेडा यांनी ही नाणी शहर पोलिस ठाण्यात आणली. मान्यताप्राप्त सराफाकडून 500 नाण्यांची तपासणी करण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया करून ही सर्व नाणी ताब्यात घेण्यात आली आहेत. या कार्यवाहीनंतर ही नाणी पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.