कचरा डेपो विरोधातील आंदोलन सुरूच, बागडे यांचा मध्यस्थीस नकार
औरंगाबाद, दि. 15, ऑक्टोबर - नारेगाव येथील कचरा डेपो प्रकरणी सुरू झालेले नारेगाव येथील नागरिकांचे आंदोलन आज दुसर्या दिवशीही चालू होते. या प्रकरणी महापालिका प्रशासनाने मध्यस्थीचे प्रयत्न केले. परंतु ग्रामस्थ आपल्या निर्धारापासून हटले नाही. सदर प्रकरणी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मध्यस्थी करावी, असा प्रयत्न महापालिका प्रशासनाने केला. परंतु बागडे यांनी मध्यस्थी करण्यास नकार दिला.
नारेगाव येथे कचरा टाकण्यास 13 गावांतील ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. कालपासून त्यांनी कचरा टाकणार्या गाड्या रोखून धरल्या आहेत. काल दिवसभराच्या प्रयत्नानंतर आज महापालिका आयुक्त दीपक मुगळीकर, महापौर भगवान घडामोडे, नगरसेवक राजू शिंदे, शिवाजी दांडगे, गोकुळ मलके, शहर अभियंता साखराम पानझडे यांनी आंदोलन करणार्या ग्रामस्थांची भेट घेतली व तीन महिन्याच्या आत पर्यायी जागा शोधण्याचे आश्वासन दिले. परंतु आंदोलन करणार्या लोकांनी या आश्वासनावर विश्वास ठेवला नाही. महापौरांनी पर्यायी जागा शोधण्याबाबत काल दिवसभर जिल्हाधिकार्यांशी झालेल्या चर्चेची माहिती आंदोलकांना दिली. परंतु त्यावर आंदोलन करणार्यांचे समाधान झाले नाही. विधान परिषद अध्यक्ष ह
रिभाऊ बागडे शहरात आहेत. त्यांनी या प्रकरणी मध्यस्थी करावी, असा प्रयत्न महापालिकेच्या लोकांनी केला. परंतु लोकांनी घेतलेली ठाम भूमिका बघता आपण या प्रकरणी मध्यस्थी करणार नसल्याचे हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. पर्याय निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्याच्या मनःस्थितीत आंदोलक नाहीत. नागरिकांनी आपल्या घरातील कचरा कुंडीवर न टाकता आपल्याकडील डस्टबीनमध्येच साठवून ठेवावा, असे आवाहन महापौर भगवान घडामोडे यांनी केले आहे.