Breaking News

केंद्रातील नरेंद्र मोंदीचे हुकूमशाही सरकार बदलण्याची गरज : अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर

बुलडाणा, दि. 31, ऑक्टोबर - सर्वसामान्य व्यक्तीसह 12 बलुतेदार व 18 पगडजातींना देशोधडीला लावणारे केंद्रातील नरेंद्र मोंदीचे हुकूमशाही सरकार बदलण्याची गरज असल्याचे  प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. 28 ऑक्टोबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर सायंकाळी भारतीय  बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमात बोलत होते. अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, स्वत:च्या कष्टानेर संसार उभा करणारा  आपला दैनंदिन गाडा चालवणार्‍या व्यक्तीला जी.एस.टी., नोटाबंदी, जनतेच्या खात्यात पैसे टाकतो, असे थापा मारणारे पंतप्रधान नेरेंद्र मोदी आता थापाडे म्हणून ओळखले जाऊ  लागले आहेत. समाजामध्ये धर्मांध शक्तींच्या अंधश्रध्देला खतपाणी खालून पुरोगामी विचारवंत असणाठया अ‍ॅड. पानसरे, नरेंद्र दाभोळकर यांचा हत्यारा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाची फळी असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमात मंचावर अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे भिमराव तायडे तर प्रमुख अतिथीमध्ये माजी जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ सोनोने,  आ.बळीराम सिरस्कार, माजी आ.हरिदास भदे, बुलडाणा नगराध्यक्षा नज्जमुनीसा बेगम मो सज्जाद, अकोला जि.प. अध्यक्ष संध्याताई वाघोदे, माजीमंत्री दयाराम भांडे, भारिप  जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भोजने, युवा आघाडीचे चेतन घिवे, शरदभाऊ वसतकार, कृउबास उपसभापती निलेश दिपके, पंजाबरावदादा देशमुख, पुज्यभंते विनयपाल, भंते, नागसेन,  बुध्दपुत्र बोधानंद, स्वरानंद आदी भंते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आ.सिरस्कार माजी आ.हरीदास भदे, जि.प.अध्यक्ष संध्या वाघोदे, माजीमंत्री डि.एम.भांडे यांनी  आपल्या मनोगतात आजच्या बदलत्या परिस्थिवर सत्ता बदल होण्याकरिता परिवर्तन घडविण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान भारतीय बौद्ध महासभेच्या व भारिप बहुजन महासंघ यांच्यावतीने अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांचा मोठया गुलाबपुष्पाचा हार देऊन सत्कार करण्यात आला. बुलडाणा  नगराध्यक्षा नजमुन्नीसा मो. सज्जाद यांनी आपल्या खास शैलीमधून शेरो शायरीने भाषणातून उपस्थितांची वाहवा मिळविली. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकराचं प्रबुद्ध भारत या व अ‍ॅड.  प्रकाश आंबेडकर संपादक असलेल्या पाक्षिकाचे उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत विमोचन करण्यात आले. त्यानंतर मोताळा तालुक्याच्या बौद्ध बांधवांच्या वतीने देणगी देण्यात  आली. त्याचबरोबर अशोकभाऊ सोनोने यांनी या पाक्षीकास एक लाख बुलडाणा नगराध्यक्षा नजमुन्नीसा बेगम यांनी सुध्दा या पाक्षीकास एक लाख रुपयाची देणगी सभेमध्ये जाहीर के ली. या कार्यक्रमामध्ये संपूर्ण नगर परिषद मैदानामध्ये भरगच्च संख्येने नागरिक, महिला व युवक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मंचावर उपस्थित मान्यवरांना समता सैनिक दलाने  मानवंदना दिली. तदनंतर बौद्ध भिक्खूंनी धम्मवंदना घेतली. माजी जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ सोनोने यांनी दोन महिन्यांमध्ये भारिप बमसच्या कामाला बळकट करण्याकरिता नवीन  युवकांना स्थान देऊ, असे अभिवचन दिल्यामुळे सभेतून टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यक्रमाचे संचलन जिल्हा सरचिटणीस डॉ.अनिल वानखडे यांनी केले. या सभेकरिता  जिल्ह्यातून बौद्ध बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. शहर निळे झेडे पताकांनी फुलले होते शहरामध्ये दुपारपासून कृउबासच्या अकोला रोड टिएमसी यार्डाजवळून डॉ.बाबासाहेब  आंबेडकरांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामध्ये लेझीम पथके समता सैनिक दलाचे सेवक व गीत संगीताच्या ’कसा शोभला असता भीम नोटावर’च्या  गीतावर अवघी तरुणाई थिरकत मिरवणुकी निघाल्या होत्या.
बसस्टॅन्ड, न.प. मैदान परिसर येथे भीम सैनिकांकरिता विविध संघटनांच्या वतीने अल्पोहाराचे ठिकठिकाणी वितरण करण्यात आले. सभेच्या स्थळी महापुरुषांचे जीवनावरील व बौद्ध  धर्मीय पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात आले होते. सभेस्थानी निळे झेंडे व भरगच्च अलोट गर्दीने रस्तेही फुलून गेले होते.