Breaking News

बालक व महिला अत्याचारात वाढ : चित्रा वाघ

मुंबई, दि. 31, ऑक्टोबर - गेल्या तीन वर्षांत एकतरी घटक समाधानी झाला का ? ज्यांच्या जादूला लोक भुलले, त्याच सरकारच्या काळात बलात्कार, छेडछाड वाढली आहे. या  राज्यात महिला व बालके सुरक्षित नाही. क्राईम रेट वाढला आहे. बेटी बचाव, बेटी बढाव अभियान राबविले जात आहे. जिथे महिलाच सुरक्षित नाहीत, तेथे हे अभियान काय  उपयोगाचे ? असा प्रश्‍न करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गृहराज्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते काय करत आहेत ? असा प्रश्‍न  उपस्थित केला. सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला त्या संबोधित करत होत्या.