बळीराजा चेतना अभियानाचा उस्मानाबाद पॅटर्न राज्यभर राबविणार - दिवाकर रावते
उस्मानाबाद, दि. 31, ऑक्टोबर - जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियानामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळला असून या अभियानांतर्गत शेतकर्यासाठी काय केले याचा उस्मानाबाद पॅटर्न निर्माण होणार असून हा पॅटर्न संपूर्ण राज्यभर राबविण्यासाठी विचार केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दिवाकर रावते यांनी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पालकमंत्री रावते यांच्या अध्यक्षतेखाली बळीराजा चेतना अभियान व विविध कामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री रावते म्हणाले की, बळीराजा चेतना अभियानासाठी उस्मानाबाद जिल्ह्याची पथदर्शी जिल्हा म्हणून शासनाने निवड केली आहे, या अभियानामुळे शेतकर्यासाठी काय केले पाहिजे याचा एक पॅटर्न निर्माण करायचा आहे, त्यामुळे अभियानांतर्गत चांगले काम केले पाहिजे, यात कृषी विभागाने पुढाकार घेतला पाहिजे. या जिल्ह्याने जे निर्माण केले ते संपूर्ण राज्यभर राबविण्याचा विचार केला जाईल.
त्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाच्या प्रत्येक कल्याणकारी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचाही आढावा घेण्यात आला तसेच नरेगा मधून जास्तीत जास्त कामे जिल्ह्यात सुरु करावेत, यात वैयक्तिक लाभाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे, यात शेततळ्याची काम मोठ्या प्रमाणात झाली पा हिजेत, महाराष्ट्रातील सर्वात जास्त शेततळ्याचा जिल्हा व्हावा यासाठी प्रशासनाने काम करावे, यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार देखील उपलब्ध होईल, यावर्षी पाऊस चांगला झाला आहे मात्र पाणी वाया जाऊ नये म्हणून उपाययोजना केल्या पाहिजेत त्या दृष्टीने आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री श्री.रावते यांनी यावेळी दिल्या.