विद्यमान सरकारने कोकणच्या तोंडाला पाने पुसली - सुनील तटकरे
मुंबई, दि. 31, ऑक्टोबर - सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्याची चांगली संधी आहे. सरकारच्या फसव्या योजना जिल्ह्यातील जनतेसमोर पोहोचवण्यासाठी जनप्रबोधन केले पाहिजे. त्याची सुरुवात महामार्ग दुरुस्तीसाठी आंदोलन करून स्थानिकांनी करावी, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित पक्ष बांधणी मेळाव्यात बोलताना केले.
तटकरे यांनी केंद्रातील परिवर्तनाला साडेतीन तर राज्यातील परिवर्तनाला तीन वर्षे झाली. काय विकास झाला? काय बदल घडले? जनधन खात्यात दीड रुपये तरी जमा झाले क ाय? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अर्थसंकल्प आघाडी सरकारने नऊ कोटीवरुन 90 कोटींवर नेला होता. आज तो अर्थसंकल्प वाढविण्याची क्षमता पालक मंत्र्यांमध्ये आहे का? पालकमंत्री केसरकर यांच्याजवळ विकास करण्याची राजकीय इच्छाशक्ती नाही, असे सांगत देशात सर्वात स्वच्छ जिल्हा पुरस्कार मिळवलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरी येथील गवत देखील ते कापून घेऊ शकत नाहीत. यावरून त्यांच्या कामाचा अंदाज येत असल्याचा टोमणा तटकरे यांनी मारला.