हिंगोली बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे हरिश्चंद्र शिंदे
हिंगोली, दि. 31, ऑक्टोबर - हिंगोली येथील बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे हरिश्चंद्र शिंदे तर उपसभापतीपदी शंकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर या दोघांचेच अर्ज आले होते. छाननीत दोन्हीही अर्ज वैध ठरले असून राजकीय समिकरणे बदलणारी ही निवडणूक ठरली आहे.
शिंदे यांचे सूचक कावरखे तर अनुमोदक घुगे व पाटील यांचे सूचक वाबळे तर अनुमोदक वडकुते हे होते. छाननीनंतर सहा. निबंधक औंढा एम.ए. भोसले यांनी या दोन उमेदवारांच्या निवडीची घोषणा केली सदर निवडीनंतर भाजपच्या गोटात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.