Breaking News

अमळनेर तालुक्यात भाजपची मुसंडी; जिल्ह्यात 22 पैकी 19 ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

जळगाव, दि. 31, ऑक्टोबर - अमळनेर तालुक्यातील दुस-या टप्प्यात झालेल्या 7 ग्रामपंचायतींचा निकाल पहाता भाजपाने जोरदार मुसंडी मारत 22 पैकी तब्बल 19  ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकावून विरोधकांना जवळपास भुईसपाट केले आहे. 7 ग्रामपंचायतपैकी चोपडाई व कोंढावळ या ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या.
आगामी काळात होणा-या मोठ्या विजयाची ही नांदी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा करिश्मा कायम असल्याचा विश्‍वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी व्यक्त केला  आहे. ग्रामपंचायती निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर हे चित्र स्पष्ट झाले आहे. डांगर बुद्रुक मध्ये सरपंचपदी नलुबाई गुलबा कापडणे (569), मुंगसे येथील सरपंचपदी प्रकाश  रामदास कोळी (248), बाह्मणेच्या सरपंचपदी प्रविण ओंकार पाटील (304), जैतपीरच्या सरपंचपदी निलेश शिवाजी बागुल (866), खापरखेडा प्र.डांगरी सरपंचपदी कविता सतिष  पाटील (329), चोपडाई गावातील सर्व सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली असून सरपंचपदी राजश्री संजय पाटील तर कोंढावळ गावातील सर्व सदस्यांची निवड बिनविरोध  करण्यात आली असून सरपंचपदी सविता प्रल्हाद पाटील यांची निवड करण्यात आली आहे.