देवगडमध्ये माहेश्वरी समाजाची राज्यस्तरीय बैठक
नेवासा, दि. 30, ऑक्टोबर - अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेच्यावतीने दि. 4 व 5 रोजी श्री क्षेत्र देवगड (नेवासा) समाजभूषण ओंकारनाथ मालपाणीनगर येथे महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या राज्यातील 500 कार्यकर्त्यांची कार्यकारिणी बैठक व राज्यस्तरीय माहेश्वरी भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष विठ्ठलदास आसावा यांनी दिली.
राज्यस्तरीय पुरस्कारार्थीमध्ये श्रीमती ललिताजी मालपाणी यांना मानाच्या महेश भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. विविध सामाजिक, धार्मिक कामात अविरतपणे पुढाकार व निराधार महिलांकरीता प्रदेश सभेअंतर्गत असलेल्या महेश सेवा निधीस भरीव सहकार्य तसेच महिलाकरीता विशेष संघटनात्मक कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार श्रीमती मालपाणी यांना जाहीर झाला आहे. तर 100% गुण प्राप्त करून इ. 10 मध्ये उत्तीर्ण झालेली शेवगांवची कु. सीया रामेश्वर जाजू ही प्रदेश स्तरावर प्रथम आली असून तिलाही सन्मानित करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलदास आसावा यांनी स्पष्ट केले. संगमनेरच्याच शकुंतला सारडा, सोनईच्या स्वाती अट्टल, उत्कृष्ट कार्य करणार्या जिल्हा सभा, शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदिपक यश संपादन केलेले विद्यार्थी यांनादेखील सन्मानित केले जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास माहेश्वरी बंधु-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश व अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, सत्रातील ही पहिली संधी अहमदनगर जिल्ह्यास प्राप्त करून दिल्याबद्दल प्रदेश सभेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलदास आसावा यांनी आभार मानले.