कुळधरणला मोकाट कुत्र्यांचा उपद्रव पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत ; प्रशासन सुस्त
कुळधरण, दि. 30, ऑक्टोबर - कर्जत तालुक्यातील कुळधरणमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने प्रवासी व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. मोकाट कुत्री दुचाकी वाहनचालकांच्या मागे लागत असल्याने अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. गावातील गल्लीबोळात मोकाट, उपद्रवी कुत्र्यांची संख्या वाढली असून यामुळे परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. गावातील एक मोठा पांढरा कुत्रा पिसाळल्याने त्याची दहशत निर्माण झाली असुन त्याचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना रस्त्यावरून जाणेही अवघड झाले आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याने पायी चालणेही अवघड होऊन बसले आहे. छत्रपती शिवाजी चौक, जगदंबा मंदीर, धालवडी फाटा येथे मोकाट कुत्र्यांचा वावर अधिक आहे. कुळधरण-कर्जत तसेच श्रीगोंदा मार्गावरील प्रवाशांना मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
मोकाट श्वानांची संख्या वाढू नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाकडुन भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची आवश्यकता आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत पाठपुरावा करुन यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. दरम्यान. कुळधरणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दर महिन्यात कुत्र्याने चावा घेतलेले सुमारे 20 ते 25 रुग्ण उपचारासाठी येत असून उपचाराच्या सर्व सुविधा केंद्रात उपलब्ध असतात, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. सोनवणे यांनी दिली. घरगुती तसेच हॉटेलचे अन्न उकिरड्यावर टाकले जाते. सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्यांचा वापर होत नाही. निर्बीजीकरण न करणे यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवल्यास भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवता येईल, असेही ते म्हणाले.