Breaking News

नदीवर पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

औरंगाबाद, दि. 15, ऑक्टोबर - या पावसाळ्यात चांगल्या पावसाने ब-याच वर्षात नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे हौसे मंडळी नदीवर पोहोण्यास जात असल्याने होणा-या दुर्घटना घडत आहेत. औरंगाबादनजिक शेंद्रा येथे नदीवर पोहावयास गेलेला युवक बुडून मरण पावल्याची घटना आज घडली. सागर मंगेश घोडेराव हा 22 वर्षीय युवक शेंद्रा परिसरात नदीवर पोहोण्यास गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. या घटनेने शेंद्रा भागात शोककळा पसरली. पोलिसांनी घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.