महाड टपाल कार्यालयात उद्यापासून रेल्वे तिकीट आरक्षणाची सुविधा
अलिबाग, दि. 15, ऑक्टोबर - महाड (जि. रायगड) येथील पोस्ट ऑफिसमध्ये येत्या सोमवारपासून (दि. 16 ऑक्टोबर) रेल्वेची तिकीट प्रवासी आरक्षण यंत्रणा (पीआरएस) कार्यान्वित होणार आहे.
रेल्वेमार्ग नसलेल्या शहरांमधील प्रवाशांना रेल्वेच्या तिकिटाचे आरक्षण करणे गैरसोयीचे होत असल्याने त्यांना प्रवास करता येत नाही. हा त्रास टाळण्याचा प्रयत्न रेल्वकडून केला जातो. दक्षिण रायगड जिल्ह्यातील महाड हे ठिकाणही रेल्वेने जोडले गेलेले नसल्याने महाडसह त्या परिसरातील प्रवाशांची गैरसोय होते. ती दूर करण्यासाठी येत्या सोमवारपासून महाड येथील टपाल कार्यालयात पीआरएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचा लाभ महाड, पोलादपूर आणि श्रीवर्धन तालुक्यातील प्रवाशांना होणार आहे. सध्या महाडपासून 35 किलोमीटरवरील माणगाव स्थानकावर तिकीट आरक्षणासाठी जावे लागत होते. आता ती गैरसोय दूर होणार आहे.