मुंबई, दि. 30, ऑक्टोबर - टिळकनगर रेल्वे स्थानक परिसरातील संक्रमण शिबिरामधील एकाच इमारतील सुमारे 11 घरांच्या दरवाजांच्या कड्या तोडून चोरी करण्यात आली आहे. या घटनेत चोरांनी 3 लाख 29 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी कुर्ला नेहरू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.