Breaking News

जनावरांच्या छावण्या चालविणा-यांची सोमवारी बैठक

बीड, दि. 15, ऑक्टोबर - जिल्ह्यातील सर्व छावणी चालकांची महत्त्वपूर्ण बैठक दि. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह बीड येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सन 2015-16 साली पडलेल्या भिषण दुष्काळात अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांची जिल्ह्यातील विविध भागात छावण्या चालवून शेतकर्यांचे पशूधन वाचवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले होते. परंतु शासनाच्या व प्रशासनाच्या वतीने प्रत्येक देयकावर 5 टक्के दंड व शेणापोटी प्रत्येक जनावरामागे 7 रुपये कपात केली होती. या सर्व गोष्टी सातत्याने शासनाच्या समोर आणूनही छावणी चालकांना न्याय मिळाला नाही. या सर्व गोष्टींवर सविस्तर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी छावणी चालकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सर्व छावणी चालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राजेंद्र मस्के, अशोक हिंगे, रमेश पोकळे, डॉ. रमेश पानसंबळ, किशोर जगताप, प्रभाकर कोलंगडे, कुंडलिक खांडे, अनिल घुमरे, शाम तुपे, सुहास पाटील, गणपत डोईफडे, अमोल तरटे, सुनिल सुर्यवंशी, कलंदर पठाण, सुधीर घुमरे, भगवान केदार, सुनिल गवते, संदीपान चव्हाण, बबन माने, बळीराम गवते, योगेश शेळके, अशोक लोढा, रामहरी मेटे, सचिन कोटुळे, गणेश वरेकर, शामराव पडुळे, सुंदर चव्हाण आदींनी केले.