विनातिकिट प्रवास करणा-यांकडून पश्चिम रेल्वेची 7 कोटी 19 लाखांची वसुली
मुंबई, दि. 14, ऑक्टोबर - सप्टेंबर महिन्यात विना तिकिट प्रवास करणा-या पश्चिम रेल्वेच्या 1 लाख 83 हजार प्रकरणांत 7 कोटी 19 लाक रुपयांची दंड वसुली करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 5.45 टक्के अधिक आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज दिली. याशिवाय 876 भिकारी व अनधिकृत फेरीवाल्यांना रेल्वे हद्दीतून बाहेर काढून त्यांच्याकडून दंड वसुली करण्यात आली. यामध्ये 150 जणांना तुरुंगातही पाठवण्यात आले.यामध्ये 12 वर्षांहून अधिक वयाच्या 55 विद्यार्थी महिला डब्यांतून प्रवास करताना आढळले, असेही श्री. भाकर यांनी सांगितले.