लांज्यात 5 नोव्हेंबरला कबड्डीसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा
रत्नागिरी, दि. 31, ऑक्टोबर - लांजा कबड्डी असोसिएशनच्या वतीने 20 वर्षांखालील मुलामुलींची जिल्हा स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा 5 नोव्हेंबरला लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या संघात तालुकास्तरावरील गुणवान खेळाडूंना सहभागी होता यावे, यासाठी ही निवड चाचणी घेण्यात येते. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील खेळाडू सहभागी होतात. सहभागी खेळाडूंमधील उत्कृष्ट कामगिरी करणा-या खेळाडूंना जिल्हा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाठविले जाते. यासाठी काही निकष ठरविण्यात आले आहेत. त्यामध्ये 20 वर्षांखालील मुलांचे वजन 70 किलो व मुलींचे वजन 65 किलो असणे आवश्यक आहे. त्याबरोबर बोर्ड परीक्षेची रिसीट, एक फोटो, संघातील नोंदणी ओळखपत्र आवश्यक आहे. अ धिक माहितीसाठी कार्यवाहक रवींद्र वासुरकर यांच्याकडे इच्छुकांनी संपर्क साधावा. निवड चाचणीला जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित राहावे, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष महंमद रखांगी केले आहे.