राजापूरच्या रिफायनरीतून रोजगाराची मोठी संधी मिळणार असल्याचा कंपनीचा दावा
रत्नागिरी, दि. 31, ऑक्टोबर - जगातील सर्वांत मोठी ग्रीन रिफायनरी नाणार (ता. राजापूर) येथे उभारण्यात येणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), हिंदुस्थान पेट्रो लियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल) या तीन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांद्वारे उभारण्यात येणार्या या कंपनीमुळे स्थानिकांसह जिल्ह्यातील लाखो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचा दावा कंपनीने पत्रकाद्वारे केला आहे.
दरवर्षी 60 दशलक्ष टन उत्पादन करणार्या प्रस्तावित शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल संकुलाच्या माध्यमातून विशिष्ट उपयोगांसाठी आवश्यक असणारी उच्च दर्जाची एलपीजी, गॅसोलिन आदी इंधने व मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यात येणार आहेत. या संकुलात उत्पादित करण्यात येणार्या इंधनोत्पादनांचा दर्जा बीएस 6 प्रमाणित राखण्यात येणार आहे. विविध प्रक ाराच्या इंधनांच्या मागणीची पूर्तता करण्याच्या हेतूने पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींचे उत्पादन करण्यासाठी या संकुलातील प्रक्रिया विभाग अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खास डिझाइन करण्यात येणार आहे. त्यानंतर उच्च दर्जाची ऊर्जा क्षमता बाळगण्यासाठी दर्जेदार तंत्रज्ञानातून शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे.
पेट्रोल, डिझेल, एव्हिएशन टर्बाइन इंधन इत्यादींसारख्या विविध प्रकाराच्या इंधनांसाठीची मागणी हंगामानुसार बदलत जाते. मालाची वाहतूक आणि शेतीच्या कामांमध्ये डिझेलचा वापर केला जातो. कृषी व वीजनिर्मितीसाठी इंधन मागणी हंगामानुसार बदलत असते. उत्सवी काळात एलपीजी, केरोसीन इत्यादींसारख्या घरगुती इंधनांसाठी अधिक मागणी असते. हीच मागणी पेट्रोकेमिकल्सच्या बाबतीतसुद्धा दिसून येते. जुने शुद्धीकरण संकुल क्षमतांच्या अभावांमुळे अशा प्रकारच्या इंधनांच्या मागणीची पूर्तता करण्यामध्ये मागे पडतात. नवीन शुद्धीक रण प्रकल्प क्रूड तेल, तसेच घनीभूत, वॅक्सी क्रुड तेलांसारख्या पर्यायी पुरवठ्याची पूर्तता करणार्या क्षमतांसह तयार करण्यात आले आहे. क्षमताधिष्ठ रचनेमुळे मागणी असलेल्या इंधनांची जलदपणे निर्मिती केली जाणार असल्याचे शुद्धीकरण प्रकल्पाच्या क्षमतेबाबत बोलताना आरआरपीएलच्या प्रवक्त्यांनी सांगितले.