Breaking News

कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर ‘महात्रिपुरा’ कार्यक्रमाचे आयोजन

कल्याण, दि. 30, ऑक्टोबर -  त्रिपुरोत्सव समिती किल्ले दुर्गाडी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व तरुण स्वयंसेवकांच्या माध्यमातून कल्याणच्या किल्ले दुर्गाडीवर 3 नोव्हेंबर  2017 रोजी संध्याकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत ‘महात्रिपुरा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
किल्ले दुर्गाडी व रा.स्व.संघ यांचा संबंध फार जुना साधारण 1934 ला कल्याणात संघाची शाखा सुरु झाली. अगदी डॉ. हेडगेवारही कल्याणच्या शाखेवर येऊन गेले. या संघशाखेचे  अनेक मोठे खेळ/युद्धाचे खेळ या किल्यावर होत असत. भारत स्वतंत्र झाल्यावर 26 जानेवारी 1950 या दिवशी दुर्गाडी किल्यावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकविण्याचा कार्यक्रम झाला.  त्याआधी कल्याणातून 550 गणवेषातील संघ स्वयंसेवक, पोलीस व होमगार्ड यांचे संयुक्त संचलन निघाले. संघाच्या बँडचे प्रमुख श्री. रामभाऊ फडके तर मुख्य शिक्षक त्यावेळच्या  न्यू हायस्कूल मधिल शिक्षक श्री. बंडोपंत गोगटे होते. कार्यक्रमाला मामलेदार वागळे व श्री. डेव्हीड हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. संघ स्वयंसेवक अधून मधून जावून किल्ला व  दुर्गादेवी मंदिर स्वच्छ करीत असत. 1 मे 1960 च्या महाराष्ट्र दिनी नागरिकांची मोठी मिरवणूक किल्ल्यापर्यंत येणार होती म्हणून आदल्या दिवशी स्वयंसेवकांनी किल्ला व मंदिर स्वच्छ  केले. मिरवणूक आली, नगराध्यक्षा सुशिलाबाई खोब्रागडे यांनी देवीची पूजा केली. त्याच वर्षीपासून त्रिपुरोत्सव किल्यावर मोठ्या प्रमाणात सुरु झाला. हे 57 वे वर्ष आहे. स्वयंसेवक  घरोघरी तेल व पणत्या जमा करतात व किल्यावर त्रिपूर लावतात.