अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या पोलीस उपनिरीक्षकास 10 वर्षाची सक्तमजुरी
6 ऑगस्ट 2016 रोजी उस्मानाबाद शहरात बनसोडे याने भाड्याने शेजारी राहणा-या अल्पवयीन मुलीवर धमकावून बलात्कार केला होता. मुलीने तिच्या वडिलांना हा प्रकार सांगितल्यानंतर बनसोडेविरूद्ध उस्मानाबाद येथील अनंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. बनसोडेला अटक करण्यात आली होती त्याचे निलंबन झाले होते. नंतर खटला सुरू झाला होता. न्यायालयात जलदगतीने खटला चालवुन ही शिक्षा झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. शिक्षेबरोबरच बनसोडे याला एक लाख 5 हजार रुपयांचा दंड आकारला आहे.