सेलु येथील भारतीय सैन्य दलातील जवानाची पत्नी मुलीसह अरूणाचल येथून गायब
परभणी, दि. 14, ऑक्टोबर - अरूणाचल प्रदेशातील टेंगा येथून सेलू येथील भारतीय सैन्य दलातील जवानाची पत्नी आणि एक वर्षाची मुलगी 20 सप्टेंबरपासून बेपत्ता झाली असून त्यांचे नातलग चिंतीत आहेत.
अरूणाचल प्रदेशातील टेंगा या ठिकाणी अनिल गोंडगे (मूळ गाव गोंडगे पिंपरी, ता. सेलू) हे भारतीय सैन्य दलात नायक पदावर असून पत्नी आणि दोन मुलांसह लष्करी वसाहतीत राहतात. 20 सप्टेंबर रोजी त्यांची पत्नी स्वप्ना (वय 33) व एक वर्षाची मुलगी आरा यांनी टेंगा येथून जवळ असलेल्या नागोबा मंदिराला जात असल्याचे सांगून बाहेर पटले ते परत आलेच नाहीत. आसपास शोधून शेवटी पोलिसांत हरवल्याची तक्रार नोदंवण्यात आली.
सीसीटीव्हीत दिसून आले होते.या भागात काही सीसीटीव्ही कॅमेरे असून स्वप्ना व मुलीसह एका वाहनात बसल्याचे त्यात दिसले. भारतीय सैन्य दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव बल पथकही त्यांचा शोध घेत आहेत. सध्या अनिल गोंडगे हे ओम (वय 7) या मुलासह सेलुत आहेत. अरूणाचल पोलिसांनी शोध घेण्यासाठी मदत करावी, अशी त्यांची मागणी असून संपूर्ण कुटुंब अस्वस्थ आहे.