Breaking News

सोलापुरात क्ष-किरण शास्त्रज्ञांची उद्यापासून राज्यस्तरीय परिषद

सोलापूर, दि. 14, सप्टेंबर - महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट इमेजिंग असोसिएशनच्या सोलापूर शाखेच्या वतीने 15, 16, 17 सप्टेंबर रोजी सोलापुरात क्ष-किरण  शास्त्रज्ञांची (रेडिओलॉजिस्ट) राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे . सोलापूरला पहिल्यांदाच हा बहुमान मिळाला, अशी माहिती राजेेश फडकुले यांनी  पत्रकार परिषदेत दिली. तीन दिवसीय परिषदेमध्ये महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकातून तसेच भारताच्या इतर ठिकाणांहून क्ष-किरण शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. यामध्ये  सध्याचे उपलब्ध असणारे डायग्नोस्टिक इमेजिंग तंत्रज्ञानाचा प्रसार, त्यातील नवीन संशोधन पद्धतींचा उपयोग रुग्णसेवेसाठी करण्यात येऊन कमीत कमी खर्चात अचूक  रोगनिदान, निष्कर्ष यांचा फायदा रुग्णांना करून देणे शिकवले जाणार आहे. या परिषदेसाठी सुमारे 300 डॉक्टरांनी नोंदणी केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र  भोसले यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन होणार आहे. या वेळी महापौर शोभा बनशेट्टी, आयुक्त अविनाश ढाकणे, डॉ. शैलेश कोरे, डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी, डॉ. संदीप  कवठाळे, डॉ. लच्याण इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या वेळी या क्षेत्रातील तज्ज्ञांचे अनुभव सर्वांना ऐकायला मिळणार आहेत. ही परिषद यशस्वी  करण्यासाठी क्ष-किरण शास्त्रज्ञ संघटना परिश्रम घेत आहे. या वेळी डॉ. वैभव मेरू, डॉ. प्रदीप देशमुख उपस्थित होते.