Breaking News

भारनियमनासंदर्भात उर्जामंत्र्यांच्या विरूध्द पोलीस ठाण्यात तक्रार

अहमदनगर, दि. 18, सप्टेंबर - राज्यात सध्या वीज टंचाई मुळे अतिशय गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे संपूर्ण राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर  भारनियमन केले जात आहे.मात्र विजेसाठी आवश्यक आसणार्या कोळशाची उपलब्धता करण्याचे योग्य नियोजन करून न ठेवल्याने राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर  बावनकुळे हेच या स्थितीला जबाबदार आहेत.त्यामुळे उर्जामंत्र्यांच्या विरूध्द आपली फिर्याद दाखल करून घ्यावी,असा आग्रह केदारेश्‍वर साखर कारखान्याचे अध्यक्ष  अ‍ॅड.प्रताप ढाकणे यांनी धरल्याने पाथर्डी पोलीसांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
भारनियमनाच्या अनुषंगाने केदारेश्‍वरचे अध्यक्ष प्रताप ढाकणे,पाथर्डीचे नगरसेवक बंडू बोरूडे,चाँद मणियार,संजय डोमकावळे, महेश बोरूडे,अनिल डाकणे,पप्पू  दहिफळे,सोमनाथ टेके व सीताराम बोरूडे आदि कार्यकत्र्यांनी थेट पाथर्डी पोलीस ठाण्यात जाऊन उर्जामंत्री बावनकुळे यांच्या विरूध्द फिर्याद दाखल करून  घ्यावी,असा आग्रह धरला.यावेळी ढाकणे म्हणाले की,मागील एक वर्षापासून वीज पुरवठा खंडित होणे,दिवसातून 6 ते 10 तास वीज पुरवठा बंद ठेवणे,असे प्रकार  सरू आहेत.त्यामुळे सर्वांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.वीज निर्मितीसाठी कोळसा उपलब्ध नसल्याने भारनियमन करावे लागत असल्याचे महावितरणचे  अधिकारी सांगत आहेत. वास्तविक पाहाता वीज निर्मितीसाठी किती कालावधीसाठी किती कोळसा लागेल,याचे एक अंदाजपत्रक असते.त्यादृष्टीने कोळसा उपलब्ध  होण्यासाठी योग्य पध्दतीने नियोजन करून ठेवावे लागते.मात्र राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेले नसल्यानेच सध्या  राज्यभरात वीज टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.त्यामुळे या परिस्थितीला उर्जामंत्रीच जबाबदार असल्याने त्यांच्या विरूध्द आपली फिर्याद दाखल करून  घेण्याचा आग्रह ढाकणे यांनी धरला.पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकारी तसेच महावितरण चे अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय  घेऊ असे सांगतले.दरम्यान येत्या 3-4 दिवसांमधअये पोलीसांनी आपली फिर्याद दाखल करून घेतली नाही तर थेट न्यायालयात जाण्याचा इशारा ढाकणे यांनी  यावेळी दिल्याने पोलीसांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.