गणेशोत्सव जनजागृतीचे मोठे माध्यम
अहमदनगर, दि. 03, सप्टेंबर - गणेश उत्सवाला 125 वर्षाची परंपरा आहे.या उत्सवात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात.त्यामुळे गणेशोत्सव हा जनजागृतीचे,समाजाभिमुख काम करण्याचे मोठे माध्यम आहे.या गणेशोत्सव काळात स्वच्छ शहर सुंदर शहर उपक्रम,पाणीबचतीचे महत्व ,पर्यावरण पूरक संदेश ध्वनिप्रदूषण इ.बाबत जागृती करणारे देखावे दाखवले पाहिजेत.पौराणिक व ऐतिहासिक माहिती देणारे देखावे दाखवले पाहिजेत.यातून खूप मोठी माहिती समाजात देता येऊ शकते.मंडळाच्या वतीने प्रबोधनपर देखावे,स्त्री अत्याचार रोखावे यासाठीचे संदेश देणारे फलक दर्शनीभागात लावले पाहिजेत.समाजप्रबोधनाचे हे खूप मोठे व्यासपीठ आहे.पावसाळ्यामध्ये कितीही वेळा रस्ते केले तरीही ते उखडतातच.हि परिस्तिथी नगरमध्येच आहे असे नाही तर ती मोठ्या शहरातही सारखीच आहे.विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.तसेच सिध्धीबाग समोरील खड्यांची मालीका संपवण्यासाठी त्या ठिकाणी मोठा भराव टाकून आधुनिक पध्द्तीने सिमेंटचा पक्का रास्ता प्रस्तावित आहे.या संदर्भात आयुक्त,मनपा चे पदाधिकारी प्रशासनातील अधिकारी यांची संयुक्तिक बैठक घेण्यात आली.काही दिवसातच या रस्त्यावरील खड्डे नाहीशे होतील. पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विकास कामासाठी मोठा निधी आणला जात आहे,शहराला वरदान ठरणारी अमृत योजनेस मंजुरी मिळालीं आहे त्यासाठी पालक मंत्री शिंदे यांनी पाठपुरावा केला होता असे त्यांनी सांगितले.
सुरेखाताई संभाजी कदम महापौर अहमदनगर महानगरपालिका
सुरेखाताई संभाजी कदम महापौर अहमदनगर महानगरपालिका