साजरा करू पर्यावरणस्नेही गणेशोत्सव
अहमदनगर, दि. 03, सप्टेंबर - गणेशोत्सव तसा खुपच पारंपारीक सण आहे घराघरांमध्ये गणेशाची मातीपासुन मुर्ती घडविणे व तिची मनोभावे 10दिवस प्रतिष्ठापना करून विसर्जित करणे असे प्राचिन काळी गणेशोत्सवाचे अतिशय पविञ स्वरूप होते. इंग्रज राजवटीत विखुरलेल्या भारतीय समाजाला केवळ धार्मिक कारणांसाठीच एकञ आणता येईल व व्यापक प्रमाणात समाजप्रबोधन करता येईल या विश्वासाने लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले. लोकमान्यांचा उद्देश सफलही झाला. पण लोखंडाने जसा गंज धरावा तसे या गणेशोत्सवाने आपले मुळस्वरूप आता बदलुन टाकले आहे. श्रद्धेची जागा आता स्पर्धेने घेतली आहे. जयराम सातपुते व त्यांची पत्नी दिपा यांनी पर्यावरणसमस्येची ज्वलंततेवर घरातुनच काही प्रबोधन करता येईल का या विचाराने त्यांनी आपल्याघरातील गणेशापासुन सुरूवात केली.घरचा गणपती शाडुमातीपासुन बनविणे व त्या गणेशापुढे स्वयंनिर्मित शाडुमातीचे हालते देखावे तयार करून समाजप्रबोधन करण्यास सरूवात केली. पण मनापासुन समाजप्रबोधनात्मक सृजनशिल व नाविण्यपुर्ण निर्मितीद्वारे टिळकांच्या शिकवणुकीचे पुररूज्जीवन करणे हा उद्देश असल्याचे व त्यांच्या कार्यामागे शिल्पकार प्रमोद कांबळे, व्यंगचित्रकारवसंत विटणकर व मानसशास्त्रज्ञ रश्मी येवलेकर यांची प्रेरणा असल्याचे सातपुते कुटूंबीय नम्रपणे सांगतात.
जयराम सातपुते प्राथमिक शिक्षक, भिंगार
जयराम सातपुते प्राथमिक शिक्षक, भिंगार