महावितरणचे गणेशोत्सवात ऑनलाईन वीजबिलाचे प्रबोधन
पुणे, दि. 04, सप्टेंबर - महावितरणने सुरू केलेल्या ऑनलाईन बिल पेमेंट सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात 25 लाखांहून अधिक ग्राहक वीजबिल ऑनलाईन भरत आहेत. या सुविधेचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा, यासाठी महावितरणने शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देऊन याबाबत भाविकांचे प्रबोधन केले.
महावितरणने ग्राहकांना वेबसाईट तसेच मोबाईल अॅपमध्ये वीजबिल पाहण्याची व ते ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, कॅश कार्ड अथवा इंटरनेट बँकिंगद्वारे वीजबिल कधीही, कोठूनही भरता येते. या सुविधेची माहिती अधिकाधिक ग्राहकांना व्हावी यासाठी महावितरणच्या वतीने शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देऊन भाविकांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. ऑनलाईन पेमेंटची माहिती देणारी पत्रके ठिकठिकाणी वितरित करण्यात आली.