चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग थांबला
सांगली, दि. 04, सप्टेंबर - चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असल्याने चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात गत दोन दिवसापासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली असून सध्या वीजनिर्मिती केंद्रातून 1560 क्युसेस विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात गत दोन दिवसापासून पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. त्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रातून येणार्या पाण्याची आवक कमी झाली आहे. पाणलोट क्षेत्रातून 1800 क्युसेस पाण्याची आवक होत असून गत 24 तासात केवळ दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चांदोली धरणाच्या वक्राकार दरवाजातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. परंतु जलविद्युत प्रकल्पातून 1560 क्युसेस पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे.