जळगाव महापालिका महापौरपदासाठी ललित कोल्हे यांचा अर्ज दाखल
जळगाव, दि. 04, सप्टेंबर - जळगाव महापालिकेचे महापौर नितीन लढ्ढा यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर महापौरपदासाठी खान्देश विकास आघाडी, मनसे, जनक्रांती आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संयुक्त उमदेवार म्हणून मनपाच्या महापौर पदासाठी उपमहापौर ललित कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दि. 7 सप्टेंबर रोजी महापौर पदाच्या निवडी साठी महापालिकेत विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. आज खाविआचे सभागृह नेते रमेश जैन, स्थायी समितीच्या सभापती वर्षा खडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सुरेश सोनवणे, जनक्रांती आघाडीचे गटनेते सुनिल पाटील यांच्यासह या चारही पक्षांचे नगरसेवक यांच्या उपस्थितीत नगरसचिव अनिल वानखेडे यांच्याकडे ललित कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी दि. 31 ऑगष्ट रोजी कोल्हे यांनी जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे उपमहापौर पदाचा राजीनामा दिला होता. विद्यमान महापौर नितीन लढ्ढा यांनी राजीनामा दिल्यामुळे जळगाव महापालिकेचे महापौर पद हे रिक्त झाले आहे. विद्यमान उपमहापौर ललित कोल्हे यांना महापौरपदाची संधी देण्यात आली आहे.
जळगाव महापालिकेत एकुण 75 सदस्य आहेत. महापौर पदासाठी 38 सदस्यांचा पाठींबा मिळविणे आवश्यक आहे. खाविआ, मनसे, राष्ट्रवादी, जनक्रांती यांचे मिळून जवळपास 60 संख्याबळ कोल्हे यांच्या बाजूने असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दि. 7 सप्टेंबर रोजी महापौर पदाच्या निवडी साठी महापालिकेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. संख्याबळ पुरेशी असतांना देखील खाविआ आणि मनसेने व्हीप बजावल्यामुळे महापौर निवडीवेळी काही वेगळ्या खेळी तर होणार नाही, याबाबतही शंका आहे.