गणेशोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या मिनी हॉस्पिटलला गणेशभक्त, पोलिसांकडून चांगला प्रतिसाद
पुणे, दि. 04, सप्टेंबर - अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी आणि उच्चरक्तदाबाच्या तक्रारी घेऊन मोठ्या संख्येने गणेशभक्त आणि पोलीस मिनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. गणेशचतुर्थीपासून आजपर्यंत सुमारे 850 पेक्षा अधिक पोलीस आणि नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये विविध तपासण्या करीत उपचार घेतले आहेत. दिर्घकाळ गणेशभक्तांची सेवा करणा-या पोलिसांना कामादरम्यान उद्भवणार्या आजारांवर मिनी हॉस्पिटलमध्ये त्वरीत उपचार मिळत आहेत.
गणेशोत्सवानिमित्त विश्रामबाग फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात निरंजन सेवाभावी संस्था संचलित मिनी हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. दरम्यान पुण्याचे सह पोलिस आयुक्त रविंद्र कदम, पुणे शहराचे वाहतूक उपायुक्त अशोक मोराळे,सहायक पोलिस आयुक्त जयश्री गायकवाड यांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांनी भेट दिली. अनेक गणेशभक्त आणि पोलिसांवर मिनी हॉस्पिटलच्या माध्यमातून उपचार करण्यात येत आहेत. पावसामुळे होणारे संसर्गजन्य रोग, ताप,अस्थमा, सर्दी, खोकला, जुलाब, उलटया, सांधेदुखी यांसारख्या तक्रारी घेऊन येणा-यांची संख्यादेखील वाढत आहे. मिनी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे, इंजेक्शन, सलाईन, बेड यांसह अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. महिलांकरीता स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीकरीता सर्व यंत्रणेसह डॉक्टर व नर्सची जणांची टीम सज्ज आहे. हा उपक्रम गणेशोत्सवात दहा दिवस शुक्रवार, दिनांक ऑगस्ट ते गणेश विसर्जनापर्यंत सुरु राहणार आहे. हॉस्पिटलजवळ रुग्णवाहिका देखील सज्ज असणार आहे. युनिव्हर्सल हॉस्पिटलचे उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले आहे.