बालभारतीने ’तो’ आक्षेपार्ह मजकुर बगळावा, काँग्रेसकडून मागणी
पुणे, दि. 04, सप्टेंबर - बालभारतीच्या इतिहास अभ्यास मंडळाने तयार केलेल्या इयत्ता 9 वी च्या इतिहास पुस्तकामध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बाबत बोफोर्स तोफ खरेदी अनुषंगाने करण्यात आलेल्या उल्लेखावर पुस्तकाचे गुणवत्ता परिक्षण करणार्या तज्ञांनी आक्षेप नोंदविला होता. मात्र त्यानंतरही डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास अभ्यास मंडळाने बोर्फस संबंधिचा उल्लेख कायम ठेवला. सर्वोच्च न्यायालयाने बोफोर्स तोफखरेदी प्रकरणामध्ये राजीव गांधी हे निर्दोष असल्याचा निकाल दिला आहे. यामुळे बालभारतीने आक्षेपार्ह मजकुर बगळावा अशी मागणी काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे.
ज्येष्ठ सामरिक तज्ज्ञ श्रीकांत परांजपे यांनी त्या इतिहासाच्या पुस्तकाचे सखोल परिक्षण करून बोफोर्स प्रकरणाच्या उल्लेखाबाबत अभ्यास मंडळाकडे आक्षेप नोंदविला होता आणि पुस्तकाच्या गुणवत्ता परिक्षणाचा अहवाल ही अभ्यास मंडळाकडे सोपविला होता. तरीही अभ्यास मंडळाने त्यावर कोणतेही कार्यवाही केली नाही. त्याच पुस्तकामध्ये बाबरी मशिद प्रकरणाच्या बाबतीत उल्लेख केलेला आहे. परंतु त्या बाबरी मशिद प्रकरणातील प्रमुख आरोपी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी मंत्री मुरली मनोहर जोशी व उमा भारती यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. या विषयावर बालभारतीचे संचालक सुनिल मगर यांच्याकडे खुलासा मागितला असताना त्यांनी सांगितले की, सन 2000 पर्यंत न्यायालयाने लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी व उमा भारती यांना दोषी ठरविले नाही त्यामुळे त्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. एकीकडे सर्यायालयाने राजीव गांधी बोफोर्स प्रकरणी निर्दोष आहेत असे आदेश दिला असताना सुध्दा विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या बाबतीत द्वेष निर्माण करण्यासाठी ते आक्षेपार्ह वाक्य पुस्तकामध्ये नमुद करण्यात आले आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आरोपी असताना सुध्दा त्यांचा राजकीय दबावाखाली उल्लेख करण्यात आलेला नाही.
डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील बालभारतीच्या इतिहास अभ्यास मंडळाने त्वरीत राजीव गांधी यांच्या बद्दलचे आक्षेपार्ह वाक्य काढून टाकावे अन्यथा पुढच्या आठवड्यात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे बालभारतीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बागवे यांनी दिला आहे.