ठाण्यातील नाल्यांवरील झोपड्यांना 24 तासात स्थलांतरण करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश
ठाणे, दि. 04, सप्टेंबर - ठाण्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी नाल्यावरील सर्व झोपडपट्ट्यांना स्थलांतरी होण्याबाबतच्या नोटीस 24 तासात देण्याचे आदेश ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.
ठाण्यात भविष्यात अतिवृष्टी झाल्यास त्यामध्ये जिवितहानी होऊ नये यासाठी नाल्याच्या काठावर असलेल्या झोपडपट्टीतील लोकांना 24 तासात स्थलांतरीत करण्याच्या नोटीसा देण्याचे आदेश आयुक्तांनी बैठकीदरम्यान दिले. अतिवृष्टीच्या काळात ज्या ठिकाणी पाणी साचते त्या भागांची यादी करून तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना उभारावी व स्वयंसेवक नेमावेत अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. अनंत चतुर्दशीच्या पूर्वी विसर्जन मार्गावरील खड्डे युध्द पातळीवर भरण्याबरोबरच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.