Breaking News

सुरेश प्रभू यांचा रेल्वे मंत्रीपदाला रामराम; रेल्वे कर्मचा-यांचे मानले आभार

नवी दिल्ली, दि. 04, सप्टेंबर -  केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयाचा कार्यभार सोडत असल्याची घोषणा केली. केंद्रीय  मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर थोड्या वेळाने प्रभू यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली. रेल्वे मंत्रीपदी असताना आपल्याला सहकार्य करणार्‍या 13  लाखांहून अधिक रेल्वे कर्मचार्‍यांचे त्यांनी आभार मानले. आता प्रभू यांच्या जागी पियूष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालय सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आहे, तर  भाजप सरकारच्या महत्वाकांक्षी नदी जोड प्रकल्पाचे जाणकार असल्यामुळे प्रभू यांच्याकडे पर्यावरण खाते सोपवण्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळालेल्या धमेंद्र प्रधान, निर्मला सीतारमण, पियुष गोयल आणि मुख्तार अब्बास नक्वी या चौघांनाही प्रभू यांनी ट्विट करून शुभेच्छा  दिल्या.