निर्मला सीतारामन संरक्षण मंत्री ; पीयूष गोयल यांच्याकडे रेल्वे
नवी दिल्ली, दि. 04, सप्टेंबर - कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळालेल्या निर्मला सीतारामन यांच्याकडे संरक्षण खात्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे . पीयूष गोयल यांच्याकडे कोळसा खात्याबरोबरच रेल्वे सारख्या अत्यंत महत्वपूर्ण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे . या आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे वाणिज्य खात्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे .
आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला . त्यावेळी सीतारामन , धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल आणि मुख्तार अब्बास नक्वी या राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्यात आली . त्यानंतर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले . त्यात संरक्षण खात्याची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार याची उत्सुकता होती . सुरेश प्रभू , नितीन गडकरी , राजनाथ सिंग यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाईल अशी चर्चा सुरु होती . मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे अंदाज चुकवत सीतारामन यांच्याकडे या अत्यंत महत्वाच्या खात्याचा कार्यभार सोपवला.
मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर संरक्षण मंत्रीपदाचा कार्यभार अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे सोपवला गेला होता . संरक्षण खाते कोणाकडे सोपवावे यावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षात बराच खल झाला होता . काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे खाते सोपवले जाणार अशी चर्चा सुरु झाली होती . आज मोदी यांनी नेहमीच्या धक्कातंत्राचा वापर करून सीतारामन यांची या पदासाठी निवड केली . सीतारामन ह्या उच्च विद्या विभूषित असून वाणिज्य मंत्रालयाचा कारभार पाहताना दाखवलेली चमक पाहूनच त्यांना ही आल्याचे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.