Breaking News

ब्लू व्हेल गेमच्या आहारी गेलेल्या बंगळुरूमधील दोघांना यापासून परावृत्त करण्यात यश

बंगळुरू, दि. 10, सप्टेंबर - ब्लू व्हेल गेमच्या आहारी गेलेल्या बंगळुरूमधील दोघांना यापासून परावृत्त करण्यात समुपदेशकांना यश आले आहे. येथील  महाविद्यालयीन मुलगा ब्लू व्हेलच्या आहारी गेला असल्याचे त्याच्या प्राध्यपकांच्या निदर्शनास आल्याने समुपदेशन करून त्याला त्यातून बाहेर काढण्यात आले.
वनिता सहायवानीच्या प्रमुख याराणी शेट्टी यांनी बाबत सांगितले की, त्याचे संशयास्पद वागणे इतर विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर  प्राचार्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. समुपदेशनापूर्वी त्या मुलाच्या फोनवरून आम्ही तो ब्लू व्हेल खेळत असल्याची खात्री करून घेतली. शिवाय  समुपदेशनादरम्यान त्यानेही हा खेळ खेळत असल्याचे कबूल केले. या मुलाने या खेळाचे पहिले दोन टप्पे पार केले होते. त्याने आपल्या एका मित्रालाही हा खेळ  खेळ्यासाठी राजी केले होते. मात्र, त्याचेही समुपदेशन करण्यात आले. या मुलांसह त्यांच्या पालकांचेही समुपदेशन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.