मुळेवाड्यातील गणपती
अहमदनगर, दि. 03, सप्टेंबर - नगर शहरामध्ये स्वयंभू अष्टविनायक स्थित आहेत.या अष्टविनायकापैकी एक गणपती म्हणजे मुळेवाड्यातील गणपती.शहरामध्ये दिल्लीदरवाजा जवळच असणार्या देशमुख गल्ली मध्ये भास्कर मुळ्यांच्या वाड्यामध्ये हि गणेश मूर्ती स्थापित आहे.हि मूर्ती संपूर्ण शेंदुराची होती.वाड्याचे बांधकाम चालू असताना या मूर्तीवर असणारा शेंदूर काडून टाकण्यात आला.आतमध्ये पांढरीशुभ्र मूर्ती होती.सुरवातीस ती संगमरवरी असावी असे वाटले.परंतु तो पांढरा भागही काढून टाकला असता त्यामध्ये सुंदर दगडाची मूर्ती होती.अतिशय सुंदर,मनमोहक दगडी मूर्तीची पुन्हा विधिवत स्थापना केली.ही मूर्ती किमान 400 वर्षांपूर्वीपासून या ठिकाणी असावी असे गिरीष मूळे सांगतात.या गणेशाचे वैशिष्टय म्हणजे या गणपतीस प्रदक्षिणा घालता येत नाही.या दगडी मूर्तीवर एक अनोखे तेज आहे.ही गणेश मूर्ति दर्शनास येणार्या भाविकांच्या मनाचा ठाव घेते.भाविक भक्तही याठिकाणी मोठ्या संख्येने येतात.मनोभावे मागितलेल्या मनोकामना हा गणेश पूर्ण करतो असे भाविकांचे मानने आहे.वाड्याच्या मध्यभागी स्थित मूर्ती मनशांती प्राप्त करून देते.अंगारकी चतुर्थी,गणेश चतुर्थी,गणेश जयंतीला या ठिकाणी उत्सवाचे स्वरूप येते.या ठिकाणी जिल्हाभरातून भाविक दर्शनास येत असतात.