Breaking News

खाकीदासबाबा मठातील गणपती

अहमदनगर, दि. 03, सप्टेंबर - शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायकांपैकी खाकीदासबाबा मठातील गणपती हे एक श्रद्धा स्थान  आहे.अष्टविनायकांमधील इतर सात गणपतींपेक्षा या मूर्तीचे वैशिष्टय वेगळे आहे. ही गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे.या मूर्तीस चार हात आहेत.यापैकी एकही हातामध्ये  आयुध,शस्त्र  नाही.चारही हाताने हा गणपती आशीर्वाद  देत आहे.शहरामध्ये दिल्लीदरवाजापासून जवळच असणार्‍या न्यूआर्ट्स कॉलेजच्या पाठीमागे खाकीदास बाबा  मठ आहे.या मठात हि गणेश मूर्ती स्थित आहे. या मठामध्ये बसण्यास प्रशस्त सभामंडप आहे.मन शांत करणारे वातावरण या ठिकाणी आहे इतर अष्टविनायकांमधील  सात गणपती पेक्षा हे स्थान जास्त परिचित आहे.अबालवृद्ध या ठिकाणी दर्शनास येत असतात.शहरामधील खूप भाविक त्याठिकाणी सकाळी दर्शनास येतात.गणेशाचे  वेगवेगळे पूजाविधी उत्सव या ठिकाणी होतात.ह्या गणेश मूर्तीचा कालखंड जवळपास 350 वर्षांपूर्वीचा असावा.खाकीदासबाबा ट्रस्ट द्वारे सेवा केली जाते. श्री.विजय  मिस्त्रा गणेशाचे पौरोहित्य करतात. मनमोहक सुंदर गणेशाची मूर्ती भाविकांचे मन तर मोहून घेतेच परंतु मनोकामना देखील पूर्ण करते अशी भाविकांची श्रद्धा आहे.