विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करेन - निर्मला सीतारामन
नवी दिल्ली, दि. 04, सप्टेंबर - माझ्यावर अत्यंत मोठी जबाबदारी सोपवली गेली आहे. माझ्या भावना कशा व्यक्त कराव्यात हे मला समजत नाही ’ अशी प्रतिक्रिया नूतन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे.
त्या म्हणाल्या की माझ्यावर जो विश्वास दाखविला गेला आहे त्याला पात्र ठरण्याचे आव्हान माझ्यापुढे आहे. या मंत्रिमडळाच्या सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीत आता आम्ही दोन महिला (सुषमा स्वराज आणि मी ) असू , ही माझ्यादृष्टीने महत्वाची गोष्ट आहे . आपण 6 सप्टेंबर रोजी संरक्षण मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारू असेही त्यांनी सांगितले .
त्या म्हणाल्या की , माझ्यासारख्या अत्यंत छोट्या गावातून आलेल्या महिलेला पक्ष नेतृत्वाने जी संधी दिली ती ईश्वरी कृपेसारखीच आहे .
इंदिरा गांधी यांच्या नंतर प्रथमच एका महिलेला संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली गेली आहे . वाणिज्य मंत्रीपदाचा स्वतंत्र कार्यभार सांभाळताना देशांच्या प्रतिनिधी मंडळांशी वाटाघाटी करताना त्यांनी चांगलीच छाप पाडली होती.