मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नागपूर, दि. 12, सप्टेंबर - 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा निवडणुकीचा कार्यक्रम आज महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भा. जोशी यांनी जाहीर केला. निवडणुकीची प्रक्रिया 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल. तर, अध्यक्षाची घोषणा 10 डिसेंबर रोजी केली जाईल.
यासंदर्भात, विदर्भ साहित्य संघात झालेल्या अ.भा.मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजतापर्यंत महामंडळाच्या मतदार याद्या उपलब्ध करण्यात येतील. त्यानंतर, संध्याकाळी 7 वाजतापर्यंत त्या याद्या निर्वाचन अधिका-याकडे सोपवण्यात येतील. तर, अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांनी 14 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजतापर्यंत आपले अर्ज घटक संस्था, समाविष्ट संस्था व संलग्न संस्थांकरवी महामंडळाकडे सादर करायचे आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजतानंतर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील. अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवरांना 23 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर, 23 ऑक्टोबर रोजीच संध्याकाळी 7 वाजतानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. 31 ऑक्टोबरपर्यंत मतदारांकडे मतपत्रिका रवाना करण्यात येतील. त्या मतपत्रिका 9 डिसेंबरपर्यंत निर्वाचन अधिकार्यांना पाठवण्यात येतील. तर 10 डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर अध्यक्षपदाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. श्रीपाद भा. जोशी यांनी दिली.