बुलडाणात होणार 91 वे मराठी साहित्य संमेलन
नागपूर, दि. 12, सप्टेंबर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दीडशे वर्षाच्या इतिहासात प्रथमच विदर्भातील बुलडाणा येथे साहित्य संमेलन होणार आहे. या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बुलडाण्यातील स्वामी विवेकानंद आश्रमाची (हिवरा आश्रम) निवड करण्यात आल्याची घोषणा अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भा. जोशी यांनी आज रविवारी नागपुरात आयोजित पत्रपरिषदेत केली. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष सुधाकर भाले, पद्माकर कुळकर्णी, डॉ़ इंद्रजित ओरके, डॉ़ विलास देशपांडे, प्रा़ मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे उपस्थित होते.
महामंडळाच्या संमेलन स्थळ निवड समितीची बैठक नागपुरातील विदर्भ साहित्य संघात असलेल्या महामंडळाच्या कार्यालयात आज, रविवारी पार पडली. यावेळी, समितीने निर्धारित केलेल्या दिल्ली मराठी प्रतिष्ठान (दिल्ली), मराठी वाङमय परिषद (बडोदा) आणि विदर्भातील स्वामी विवेकानंद आश्रम, हिवरा (बुलडाणा) या तिन स्थळांचा अहवालावर चर्चा करण्यात आली़. स्थळ निवड समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश होता. तर, महामंडळाच्या बैठकीत या सात सदस्यांसोबत महामंडळाचे इतर नऊ सदस्य उपस्थित होते़ तीन सदस्य अनुपस्थित राहिले़ समितीने 19 व 20 ऑगस्ट रोजी दिल्ली व बडोदा या स्थळांची पाहणी केली होती़. तर, 9 सप्टेंबर रोजी हिवरा आश्रमाची पाहणी केली.त्याअनुषंगाने या तीन स्थळांपैकी संमेलनासाठी एका स्थळाची निवड करायची होती़ परंतु, दिल्लीने काही तांत्रिक अडचणीमुळे 9 सप्टेंबर रोजीच आपला अर्ज मागे घेतल्याने, संमेलनासाठी बडोदा आणि बुलडाणा, या दोन स्थळांपैकीच निवड करण्यावर चर्चा झाली. त्यात रविवारी हिवरा आश्रमला पसंती देण्यात आली.बैठकीत पुणे मसाप, मुंबई मसासं, मध्यप्रदेश साहित्य संघ, विदर्भ साहित्य संघाने हिवरा आश्रमाला झुकते माप दिले. तर, मराठवाडा मसाप, तेलंगणा साहित्य परिषद, कर्नाटक साहित्य परिषद, बडोदा परिषदेने संमेलनासाठी बडोद्याला पसंती दिली़ परंतु, सर्व नियोजन आणि सोयीसुविधांचा विचार करता, महामंडळाने 91वे साहित्य संमेलन हिवरा आश्रम येथे करण्यास शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या दीडशे वर्षाच्या इतिहासात प्रथमच बुलडाणा जिल्ह्यात संमेलनाचे आयोजन केले जात आहे. हिवरा आश्रमापूर्वी 85वे साहित्य संमेलन विदर्भातील चंद्रपूर येथे झाले होते. त्यानंतर, सात वर्षानंतर विदर्भात साहित्य संमेलनाचे आयोजन होत आहे.
ग्रामपंचायतीत होणारे पहिलेच संमेलन
साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच ग्राम पंचायत भागात हे संमेलन होत आहे़ थोर ज्येष्ठ साहित्यिक ना. ग. देशपांडे यांचे मेहकर हे गाव असून, अवघ्या 12 किमीवर हिवरा आश्रम आहे़ येथे गरजू मुलांसाठी नि:शुल्क शिक्षणव्यवस्था पुरवण्यासह शेतकर्यांमध्ये विज्ञानवादाचा व्यवहार वाढवण्यावर भर दिला जातो. हजारो एकर परिसरात असलेल्या आश्रमात स्वामी विवेकानंद, ज्ञानेश्वर माऊली, गौतम बुद्ध आणि भगवान महाविरांच्या मूर्ती स्थापित आहेत. येथे 30 ते 40 हजार प्रेक्षक एकाच वेळी बसू शकतील अशी व्यवस्था आहे. ऐतिहासिक लोणार सरोवर हिवरा आश्रमपासून केवळ 30 किमी अंतरावर असून सारस्वतांना जागतिक दर्जाचे लोणार सरोवर बघण्याचा आनंद घेता येणार आहे.