Breaking News

नाशिक जिल्ह्यात पावसाच्या सरासरीने केली शंभरी पार

नाशिक, दि. 04, सप्टेंबर - जिल्ह्यात यावर्षी देवळा आणि मालेगाव तालुका वगळता सर्वत्र समाधानकारक पाऊससून ऑगस्ट महिन्यातच पावसाच्या सरासरीने  शंभरी पार केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 101 टक्के पाऊस झाला असून धरणातील एकूण पाणीसाठा 85 टक्क्यांवर पोहोचला आहे.
सर्वाधिक पावसाची नोंद नाशिक तालुक्यात 161 टक्के झाली आहे. त्या खालोखाल सुरगाणा 119, इगतपुरी 107,दिंडोरी आणि पेठ 106, नांदगाव 103, सिन्नर  100 आणि त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात 98 टक्के पाऊस झाला आहे. कळवण, निफाड आणि येवला तालुक्यात 80 टक्क्यापेक्षा जास्त तर चांदवड आणि बालुक्यात 75  टक्क्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मालेगाव तालुक्यात 57 तर देवळा तालुक्यात 58 टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान  1013 मिमि असून आतापर्यंत 1033 मिमि पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.
चांगल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यातदेखील समाधानकारक वाढ झाली असून एकूण पाणीसाठा 85 टक्क्यांवर पोहोचला आहे.  करंजवण,वाघाड,ओझरखेडतिसगाव, भावली, वालदेवी, कडवा, भोजापूर, हरणबारी, केळझर धरणात उपयुक्त पाणीसाठ्याने शंभरी ओलांडली आहे. तर दारणा,  गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी,पुणेगाव प्रकल्प आणि नांदुरमध्यमेश्‍वर बंधार्‍यात 95 टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा आहे. पालखेड आणि पुनद धरण 85 टक्क्यापेक्षा  जास्त भरले आहे. गिरणा प्रकल्पात 63, मुकणे प्रकल्पात 78, माणिकपुज प्रकल्पात 73 तर नागासाक्या प्रकल्पात शुन्य टक्के पाणीसाठा आहे.