Breaking News

सुशांत सिंग राजपूत साकारणार खलीची भूमिका

मुंबई, दि. 22, सप्टेंबर - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत पुन्हा एकदा बायोपिक करण्याची शक्यता आहे आहे. मोजक्या चित्रपटातून चाहत्यांच्या मनावर  छाप पाडणारा सुशांत सिंग लवकरच एका भव्य प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. लेजेंडरी कुस्तीपटू ‘द खली’च्या आयुष्यावर आधारित चित्रपटात सुशांत मुख्य भूमिका  साकारण्याची चिन्हं आहेत.
रेसलर दलिप सिंग राणा म्हणजेच खलीच्या जीवनावर लवकरच एक चित्रपट तयार केला जाणार आहे. खलीशी याबाबत चर्चा झाली असून त्याने निर्मात्यांना चित्रपट  निर्मितीचे हक्क दिले आहेत. या चित्रपटात सुशांत मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. खलीच्या फक्त रेसलिंग स्कील बाबतच सर्वांना माहिती आहे. मात्र  यापूर्वी तो पंजाब पोलिसात अधिकारी म्हणून कार्यरत होता. कुस्तीच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यापूर्वी त्याने खूप मोठा संघर्ष केला आहे. त्याचा प्रवास चित्रपटात  मांडला जाणार आहे.