Breaking News

कोचिंग क्लासवर आयकर विभागाची धाड

नांदेड, दि. 27, सप्टेंबर - नांदेडमधील एका इमारतीत चालणा-या चार कोचिंग क्लासवर आयकर विभागाने धाड टाकली असून या मुळे आज शहरातील इतर  कोचिंग क्लास चालकांनी क्लास बंद ठेवले होते. 
नोटाबंदीच्या काळात काही कोचिंग क्लासने दिलेल्या हिशोबात आणि क्लासच्या विद्यार्थ्यांच्यासंख्येतताळमेळ बसत नव्हता त्यामुळे बाबानगर भागात एकाच इमारतीत  चालणा-या चार कोचिंग क्लासेसवर धाड टाकली़ आयकर विभागाचे तब्बल 25 कर्मचा-यांनी तपास केला.त्यामुळे आज शहरातील इतर अनेक खाजगी कोचिंग बंद  होते.